esakal

देश

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

bullet train India launch date : जाणून घ्या, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वेमंत्र्यांनी बुलेट ट्रेनबाबत नेमकी काय माहिती दिली

Mayur Ratnaparkhe

Bullet Train Launch Date Announced by Ashwini Vaishnaw:  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशाला मोठी बातमी दिली आहे. १५ ऑगस्ट २०२७ पासून देशात बुलेट ट्रेन धावण्यास सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले आहे. एवढंच नाहीतर यावेळी  त्यांनी विनोदाने म्हटले की, "पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनी बुलेट ट्रेनने प्रवास करण्यासाठी आत्ताच तिकिटे खरेदी करा."

पहिल्या टप्प्यात, ही ट्रेन सुरत ते वापी दरम्यान १०० किलोमीटर धावेल. बुलेट ट्रेनने प्रवास करण्याचे स्वप्न पाहणारा प्रत्येक भारतीय ती सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावण्याची योजना आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, दोन्ही मेट्रो शहरांमधील ५०८ किलोमीटरचा प्रवास दोन तास १७ मिनिटांत पूर्ण होईल. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सुमारे ५५ टक्के भाग पूर्ण झाला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये या प्रकल्पाचा आढावा घेतला होता.

संपूर्ण मार्गापैकी ३५२ किलोमीटर गुजरात ते दादरा- नगर हवेली दरम्यान आणि १५६ किलोमीटर महाराष्ट्रात आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) जपानी सहकार्याने हा प्रकल्प विकसित करत आहे.

संपूर्ण प्रकल्पात अहमदाबाद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, ठाणे आणि मुंबईसह एकूण १२ स्थानके असतील. प्रकल्पाचा ८५ टक्के भाग किंवा अंदाजे ४६५ किलोमीटरचा भाग एलिव्हेटेड असेल, ज्यापैकी ३२६ किलोमीटर पूर्ण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT