Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

FASTag New Rules : जाणून घ्या, नेमका काय बदल होणार आहे आणि वाहनचालकांना कसा दिलासा मिळणार आहे?
FASTag users passing through a toll plaza as new FASTag rules come into effect from 1 February, offering relief to vehicle owners.

FASTag users passing through a toll plaza as new FASTag rules come into effect from 1 February, offering relief to vehicle owners.

esakal

Updated on

FASTag rule changes from 1 February : सरकारने सामान्य वाहनचालकांना नवीन वर्षात मोठा दिलासा दिला आहे. एनएचएआयने याबाबत एक नवीन घोषणा केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की १ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन वाहनांसाठी फास्टॅग खरेदी करताना केवायसीचा त्रास राहणार नाही.

पूर्वी, नवीन फास्टॅग खरेदी करताना, वाहनचालकांना अनेकदा केवायसीशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत असे. यामध्ये चुकीची माहिती, कागदपत्र पडताळणीतील गोंधळ किंवा वारंवार सूचना देणे समाविष्ट होते. मात्र केंद्र सरकारने देशातील अनेक नियम सोपे करण्यासाठी आणि पारदर्शक करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय  या नवीन वर्षापासून लागू होत आहेत.

यानुसार आता  सरकारने नवीन फास्टॅगसाठी स्वतंत्र केवायसीची आवश्यकता हटवली आहे. ज्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहनाचा नोंदणी क्रमांक (आरसी) आधीच पडताळला जाईल. तसेच, फास्टॅगसाठी अर्ज करताना सर्व माहिती एकदाच पडताळली जाईल.

FASTag users passing through a toll plaza as new FASTag rules come into effect from 1 February, offering relief to vehicle owners.
Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

महत्त्वाची बाब म्हणजे, जर तुमच्या वाहनात आधीच FASTag असेल, तर तुम्हाला तुमचे KYC पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. जर कोणत्याही तक्रारी किंवा समस्या नसतील तर सर्वकाही नेहमीप्रमाणे सुरू राहील. FASTag चुकीचा जारी केला गेला असेल किंवा वाहनाची माहिती चुकीची असेल तरच चौकशी केली जाईल.

FASTag users passing through a toll plaza as new FASTag rules come into effect from 1 February, offering relief to vehicle owners.
Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

फास्टॅग सक्रिय करण्यापूर्वी बँकांना आता संपूर्ण पडताळणी करावी लागेल, म्हणजेच वाहन माहिती वाहन पोर्टलशी जुळवावी लागेल. संपूर्ण पडताळणीशिवाय कोणताही FASTag सक्रिय केला जाणार नाही. सरकारचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे बनावट किंवा चुकीच्या FASTag चा वापर रोखला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com