Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Hindu man killed in Bangladesh : मागील काही दिवसांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदू व्यक्तीवर झालेला हा चौथा जीवघेणाहल्ला आहे.
A symbolic image representing concerns over rising religious violence and minority safety issues in Bangladesh.

A symbolic image representing concerns over rising religious violence and minority safety issues in Bangladesh.

esakal

Updated on

Hindu murdered in Bangladesh : बांगलादेशात मागील काही दिवसांपासून अल्पसंख्यांकांवर विशेषता हिंदूंवरील अत्याचार वाढत आहेत. कट्टरपंथी जमावाकडून अतिशय निर्घृणपणे हिंदूंची हत्या केली जात आहे. घरे पेटवली जात आहेत, प्रचंड मारहाण करून हिंदू व्यक्तींना जाळलं जात आहे. यावरून बांगलादेशच्या सरकारवर जोरदार टीकाही सुरू आहे. मात्र तरीही अद्याप या घटना रोखण्यात बांगलादेशच्या सरकारला यश आल्याचं दिसत नाही.

आता पुन्हा एका हिंदू व्यक्तीवर बांगलादेशातील कट्टरपंथीयांच्या जमावाने धारधार शस्त्रांद्वारे हल्ला केला, ज्यामध्ये हा व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. मात्र, जमाव एवढ्यावरच थांबला नाही, तर त्या हिंदू व्यक्तील नंतर जाळलं देखील गेलं.

प्राप्त माहितीनुसार, बांगलादेशात ज्या हिंदू व्यक्तीवर हल्ला झाला, त्याचे नाव खोकन दास आहे. हिंसक जमावाच्या हल्ल्यात खोकन दास गंभीर जखमी झाले होते, ज्यानंतर त्यांना जाळण्यात आले. ही घटना ३१ डिसेंबर रोजी बांगलादेशातील शरियतपूर जिल्ह्यात घडली आहे. जेव्हा खोकन दास हे घरी निघाले होते, तेव्हा त्यांच्यावर जमावाकडून हल्ला केला गेला.

A symbolic image representing concerns over rising religious violence and minority safety issues in Bangladesh.
Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान हिंदू व्यक्तीवर झालेला हा चौथा जीवघेणाहल्ला आहे. यापूर्वी, २४ डिसेंबर रोजी, बांगलादेशमधील कालीमोहर युनियनमधील हुसेनडांगा भागात जमावाने अमृत मंडल या २९ वर्षीय तरुणाला मारहाण करून ठार मारले होते. त्यानंतर मयमनसिंगमधील भालुका येथील एका कापड कारखान्यात एका हिंदू तरुणाची त्याच्या सहकाऱ्याने गोळ्या घालून हत्या केली होती. शिवाय, १८ डिसेंबर रोजी, मैमनसिंगमध्ये एका हिंदू तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि  रस्त्याच्या मधोमध झाडाला लटकवून त्याला जाळण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com