ब्रह्मोस मिसाइल सकाळ डिजिटल टीम
देश

Defence News : जगात भारतीय शस्त्रास्त्रांचा डंका, आता 'हा' देश खरेदी करणार 'ब्रह्मोस'

भारत आणि रशियाने संयुक्तपणे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Weapons Power in World : जगात भारतीय शस्त्रास्त्रांची संख्या वाढत असून, फिलिपाइन्सनंतर आता मुस्लिम देश इंडोनेशियालाही भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने आकर्षित केले आहे. त्यासाठी इंडोनेशिया भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीला लागले असून, याबाबत दोन्ही देशांमध्ये लवकरच करार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारत-रशियन ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रासाठी भारत इंडोनेशियाशी करार अंतिम टप्प्यात आहे, असे वृत्त फायनान्शिअल एक्सप्रेसने प्रकाशित केले आहे.

भारत आणि रशियाने संयुक्तपणे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारत आणि इंडोनेशिया यांच्यात वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा करार निश्चित होण्याची शक्यता आहे.

भारत इंडोनेशियाला अँटीशिप ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विक्री करणार आहे. ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या (BAPL) टीमने क्षेपणास्त्र देण्यापूर्वी इंडोनेशियाच्या शिपयार्डला भेट दिल्याचेदेखील सांगितले जात आहे. भारत आणि इंडोनेशियामध्ये हा करार निश्चित झाल्यास भारताकडून क्षेपणास्त्रे खरेदी करणारा इंडोनेशिया हा दुसरा आशियाई देश असणार आहे.

ब्राह्मोस हे अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाहता इंडोनेशियाने 2018 मध्येच ते विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काही कारणांमुळे हे होऊ शकले नाही. तर, दुसरीकडे या वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि फिलीपिन्सने ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी 37496 दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता. भारताकडून हे क्षेपणास्त्र विकत घेणारा फिलिपाइन्स हा पहिला देश ठरला होता.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वैशिष्ट काय?

जगातील अनेक देश ब्राह्मोसच्या शक्तीने प्रभावित आहेत. ब्रह्मोस हे कमी पल्ल्याच्या हायस्पीड सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे विमान, जहाज, जमीन आणि पाणबुड्यांवरून प्रक्षेपित केले जाऊ शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मॅक 2.8 च्या वेगाने हल्ला करण्यास सक्षम आहे. म्हणजेच त्याचा वेग आवाजाच्या वेगाच्या तिप्पट आहे. याची लांबी सुमारे 8.4 मीटर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT