Arvind Kejriwal Esakal
देश

Omicron : 'आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर तात्काळ बंदी घाला'

गेल्या 24 तासांत देशात 8,318 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता देशातील आंतरराष्ट्रीय विमान सेवांवर बंदी घालण्यास विलंब का केला जात आहे असा सवालदेखील केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

दिल्लीत बहुतेक लोक बाहेरून येत असतात या सर्वाचा दिल्लीवर अधिक जास्त परिणाम होतो, त्यामुळे दिल्लीत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांवर लवकरात लवकर बंदी घालण्याची विनंती अरविंद केजरीवाल यांनी मोदींना केली आहे. यापूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटांचा सामना नागरिकांनी केला आहे. परंतू, नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा परिस्थिती बिघडू नये यासाठी आंतरराष्ट्रीय विमानांवर तात्काळ बंदी घालणे गरजेचे असल्याचे केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात 8,318 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले आहेत, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) आज सांगितले. तर साथीच्या रोगामुळे मृतांची संख्या 4,67,933 वर पोहोचली असून,देशात 10,967 नवीन बरे झाल्याची नोंद झाली आहे. तर, बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या 3,39,88,797 वर पोहोचली आहे. देशात सध्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.34 टक्के आहे, जो मार्च 2020 नंतर सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT