Corona New Variant : आंतरराष्ट्रीय विमानांवर निर्बंध?, मोदींचे संकेत

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत अधिक सजग होण्याची गरज
Narendra Modi
Narendra ModiANI

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आठवड्याच्या सुरुवातीला आढळलेल्या कोरनाच्या नव्या B.1.1.529 ओमिक्रोन (Omicrom) व्हेरिएंटच्या जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. या सर्व पार्श्वभूमिवर आंतरराष्ट्रीय विमान सेवांना देण्यात आलेल्या शिथिलतेबाबतच्या (Internation Flight ) निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमान सेवांवर निर्बंध लादण्यात येणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत सर्वांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचेही मोदी म्हणाले.

Narendra Modi
साऊथ आफ्रिकेतून कोरोनाचा नवा व्हेरिएंट, भारतीयांनो सावधान!

ज्या देशांमध्ये कोरानाच्या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येत आहेत, अशा देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, तसेच या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता असल्याचेही मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव आणि कोविड टास्क फोर्सच्या (Covid Tast Force) प्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली, त्यावेळी मोदींनी वरील सूचना केल्या आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला अधिक सक्रिय होण्याची गरज असून, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, नियमितपणे हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे यासह सर्व कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगातील इतर देशांमध्ये वाढत असलेली रूग्णसंख्या लक्षात घेता देशात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. तसेच आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com