देश

बेळगावात दुकानांवर कानडी भाषेत फलक लावण्यासाठी दादागिरी

मिलिंद देसाई

बेळगाव - शहरातील विविध दुकानांवर आणि आस्थापनांवर कन्नड भाषेतून फलक लावण्यात यावेत, अशी मागणी करीत रविवारी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुकांनदारांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कन्नड संघटनांची दादागिरी वेळीच बंद करावी, अशी मागणी होत आहे.

कन्नड संघटनांचे कार्यकर्ते दुकानदारावर दादागिरी करीत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलीस प्रशासन देखील कन्नड संघटनांची पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहरात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. तसेच बाजारपेठेतही मराठी भाषिक व्यापारी अधिक संख्येने आहेत त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना समजावे यासाठी मराठी भाषेसह इतर भाषेत फलक लावण्यात आले आहेत. तरीही कन्नड संघटना जाणीवपूर्वक मराठी भाषिकांविरोधात सातत्याने गरळ ओकण्याचे काम करीत असतात.  

रविवारी सकाळी काकतीवेस, गणपत गल्ली आदी भागात फिरत कन्नड संघटनांच्या कार्यकत्यांनी फक्त कन्नड भाषेतून फलक लावण्यात यावेत, असे सांगत दुकानदार व इतर व्यापाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही व्यापाऱ्यांनी देशात लोकशाही असून आम्हाला तिन्ही भाषेत फलक लावण्याची मुभा आहे तसेच महापालिकेनेही मराठी व कन्नड भाषेत फलक लावण्याची परवानगी दिली आहे. असे सांगितले तरीही कन्नड संघटनांनी दादागिरी केली. तसेच कन्नड पत्रके वाटण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून कन्नड संघटनांची शहरात दादागिरी वाढली आहे. याबाबत महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांनी आवाज उठविणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधीनी मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना वेळीच समज देणे आवश्यक आहे. अन्यथा येणाऱ्या काळात कन्नड संघटनांची दादागिरी वाढत जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT