देश

दलित महिला मेकाथोटी यांना मिळाले गृहमंत्रिपद

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचा विजय झाला. त्यानंतर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वात सरकार सत्तेवर आले. रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात दलित महिला मेकाथोटी सुचारिता यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मेकाथोटी सुचारिता या प्रथिपाडू विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. प्रथिपाडू हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. आता त्यांची राज्याच्या गृहमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल (शनिवार) पार पडला. त्यावेळी सुचारिता यांच्यासह 24 जणांना राज्यपाल ई. एस. एल. नरसिंह यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर आज जगमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप झाले. यामध्ये सुचारिता यांना गृहमंत्रिपद देण्यात आले.  

दरम्यान, सुचारिता यांची राज्याच्या गृहमंत्रिपदावर निवड झाल्याने त्यांच्या रूपाने राज्याला पहिल्यांदा दलित समाजातील गृहमंत्री मिळाला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT