Kamat will not go to BJP Opposition Leader Kavalekar believes in
Kamat will not go to BJP Opposition Leader Kavalekar believes in 
देश

Loksabha 2019 : कामत भाजपमध्ये जाणार नाहीत; विरोधी पक्षनेते कवळेकर यांना विश्वास

अवित बगळे

पणजी : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार हे भाजपमध्ये जाणार नाहीत. ते खासगी कारणास्तव दिल्लीला जात आहेत याची पक्षाला पूर्ण कल्पना आहे, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.

कामत आज सकाळी तातडीने दिल्लीला गेल्याने ते भाजपच्या सरकारचे भावी मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत प्रतिक्रीया देताना कवळेकर यांनी सांगितले, की कामत यांच्यावर अकारण संशय घेतला जाऊ नये. कामत पूर्णतः काँग्रेस पक्षासोबतच आहेत. पक्षाच्या राज्य निवडणूक समितीचेही ते अध्यक्ष आहेत. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते असून राजकीय घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष सुद्दा आहे.

कामत हे अनेक वर्षे काँग्रेससोबत आहेत. कोणी नवा आमदार असता तर त्यांच्याविषयी चर्चा सुरु झाली तर विश्वास ठेवणे हे अविचारी ठरणारे नसते. कामत जे काँग्रेस सरकारचे माजी मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसने आता सत्ता स्थापनेचा दावा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे सादर केला आहे या पार्श्वभूमीवर कोणतेही वावगे राजकीय पाऊल टाकतील याची सुतराम शक्यता नाही.

दरम्यान, कामत भाजपमध्ये येणार या चर्चेने भाजपच्या गोटातही खळबळ उडाली आहे. कृपया अफवांना बळी पडू नका, राजकीय पेचातून तोडगा काढण्यास भाजपचे राज्य व केंद्रातील नेतृत्व सक्षम असून अधिक यश संपादून करून हा पेच सोडवला, जाईल असे भाजपने व्हॉटसअॅप संदेशात म्हटले आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तब्येत काल खालावल्यापासून गोव्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली आहे. त्यातून या राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT