Kapil Sibbal Esakal
देश

Kapil Sibbal: ‘संसदेत धार्मिक विधी न होणारा भारत हवा’, कपिल सिब्बल यांचा भाजपवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी नव्या संसद इमारतीचे उद्‍घाटन केले

सकाळ डिजिटल टीम

संसदेच्या उद्‍घाटनावरून खासदार कपिल सिब्बल यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘‘मला माझा भारत नवा किंवा जुना नको, पण येथे धार्मिक विधी न होता, कायद्याने सर्वांना समान वागविले जाईल व धार्मिक श्रद्धेसाठी कोणाचाही बळी जाणार नाही, असा भारत हवा,’’ असे ते म्हणाले. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी नव्या संसद इमारतीचे उद्‍घाटन केले. त्यावेळी हे उद्‍घाटन म्हणजे विकासाच्या प्रवासातील ऐतिहासिक क्षण आहे, असे वर्णन केले. नवीन इमारत ही ‘नव्या भारता’च्या आकांक्षा व संकल्पांचे प्रतिबिंब असून अधिक मोठी ध्येय ठरवून त्याच्या पूर्णत्वासाठी काम करण्यासाठीचे ऊर्जास्रोत आहे, असे म्हटले होते.(Latest Marathi News)

यावर सिब्बल यांनी ट्विट करीत सरकार आणि भाजप म्हणतो: नवीन भारतासाठी नवीन संसद. मी म्हणतो: मला माझा भारत नवीन किंवा जुना नको आहे. जेथे १) धार्मिक विधीशिवाय संसद आहे. २) कायद्याने सर्व समान आहेत. ३) धार्मिक श्रद्धेसाठी नागरिकांचा बळी जाणार नाही, ४) तरुणांनी प्रेमविवाह केल्यास; बजरंग दलाची भीती नाही, ५) संघटित राजकारण नाही, ६) माध्यमे निपक्ष आहेत, असा भारत मला हवा आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamir Khan Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; '3 इडियट्स'मधील रँचोबाबत केला मोठा खुलासा

Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

SCROLL FOR NEXT