Rahul Gandhi: 'मैं निकला गड्डी ले के...', राहुल गांधींकडून ‘ट्रकयात्रे’चे व्हिडिओ शेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Rahul Gandhi: 'मैं निकला गड्डी ले के...', राहुल गांधींकडून ‘ट्रकयात्रे’चे व्हिडिओ शेअर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिल्ली ते चंडीगड महामार्गावरून ट्रकयात्रा केली होती. या रात्रभरच्या प्रवासाचे तसेच ट्रकचालकांशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. (Latest Marathi News)

या ३५ सेकंदांच्या व्हिडिओत राहुल गांधी ट्रकमध्ये बसून चालकाबरोबर प्रवास करताना दिसतात. त्याचप्रमाणे ते ढाब्यावर ट्रकचालकांशी संवाद साधतानाही दिसतात. गांधी यांनी आपल्या हिंदीतून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की दिल्ली ते चंडीगडदरम्यान सहा तासांच्या प्रवासात ट्रकचालकांशी छान संवाद झाला.(Latest Marathi News)

रस्त्यावरच दिवसाचे २४ तास घालवणारे ट्रकचालक देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतात. राहुल गांधी यांनी या संपूर्ण व्हिडिओची लिंकही आपल्या युट्यूब पेजवर शेअर केली आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वर मुरथाल येथील ढाब्यात ट्रकचालकांची भेट घेत त्यांच्यांशी संवाद साधला होता.(Latest Marathi News)

टॅग्स :Rahul GandhiVideophoto