Karnataka Assembly Election 2023 CM Yogi Adityanath esakal
देश

Karnataka Election : कर्नाटकात एन्ट्री होताच CM योगींनी उचलला आरक्षणाचा मुद्दा; म्हणाले, संविधानाच्या विरोधात..

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) देखील आज (बुधवार) कर्नाटकमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडले.

Balkrishna Madhale

योगी आदित्यनाथ कर्नाटक भाजपचे स्टार प्रचारक म्हणून आज त्यांच्या पहिल्या निवडणूक रॅलीत सहभागी झाले होते.

UP CM Yogi In Karnataka : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Election) तारीख जवळ आलीये. अशा परिस्थितीत राज्यात निवडणूक प्रचाराचा जोरही वाढलाय.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) देखील आज (बुधवार) कर्नाटकमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडले. योगी आदित्यनाथ यांनी म्हैसूर गाठून मंड्या जिल्ह्यात रोड शो आणि निवडणूक प्रचारात भाग घेतला. यानंतर दुपारी विजयपुरा जिल्ह्यातील बसवेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी बसवण्णाचं दर्शन घेतलं.

योगी आदित्यनाथ कर्नाटक भाजपचे स्टार प्रचारक म्हणून आज त्यांच्या पहिल्या निवडणूक रॅलीत सहभागी झाले होते. आपल्या भाषणात राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करताना ते म्हणाले, पीएफआय सारख्या संघटनांवर बंदी घालून त्यांचं कंबरडं मोडण्याचं काम आम्ही केलंय. एकीकडं भाजप सरकार पीएफआयवर बंदी घालत आहे तर दुसरीकडं काँग्रेस ते रोखत आहे.

यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी धर्मावर आधारित आरक्षणावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. योगी म्हणाले, 'धर्माच्या आधारावर आरक्षण हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे, ते असंवैधानिक आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांगजनांसाठी आरक्षणाची व्याप्ती वाढवली आहे. भारत धर्माच्या आधारावर आरक्षणाचा पुरस्कार करू शकत नाही.'

स्वातंत्र्याच्या काळाबद्दल बोलताना योगी म्हणाले, 1947 मध्ये धार्मिक आधारावर भारताची फाळणी झाली होती. धर्मावर आधारित आरक्षणाला देश पाठिंबा देऊ शकत नाही. देश दुसऱ्या फाळणीसाठी तयार नाही, असंही ते म्हणाले. एक भारत आणि श्रेष्ठ भारत ही संकल्पनाच देशाला पुढं घेऊन जाईल, यावर मुख्यमंत्र्यांनी जास्त भर दिला. मजबूत ‘डबल इंजिन सरकार’मुळं उत्तर प्रदेशात गेल्या सहा वर्षांत एकही दंगल झाली नाही, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT