Kashi Vishwanath mahant takes punitive step, bans Congress’ Prithviraj Chavan from entering temple 
देश

पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत काशी विश्वनाथ मंदिराचा मोठा निर्णय; काय आहे प्रकरण?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत काशी विश्वनाथ मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. चव्हाण यांनी केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. सरकारने हे सोने 1 किंवा 2 टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना काशी विश्वनाथ मंदिरात बंदी घालण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या देवस्थान ट्रस्टमधील सोनं ताब्यात घेण्याच्या विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतानी हा निर्णय जाहीर केला. त्याचबरोबर देशातील इतर ज्योतिर्लिंगाच्या पुरोहितांनीही चव्हाण कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचंही महंतांनी म्हटलं आहे.
----------
लॉकडॉऊन 4:0 च्या गाईडलाईन जाहीर; काय चालू, काय बंद?
---------
महाराष्ट्रातील 'या' ०७ शहरांना लॉकडाऊन 4:0 मध्ये सूट नाहीच
----------
धक्कादायक ! ज्येष्ठ साहित्यिकाचं कोरोनामुळे निधन
----------
काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच १९८३ मध्ये काशी विश्वनाथ मंदिरात चोरी झाली होती. या चोरीत काँग्रेसची मुख्य भूमिका होती, असा आरोप काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत आणि डॉ. कुलपती तिवारी यांनी केला आहे. तसेच, पृथ्वीराज चव्हाण यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. ते पूर्वाग्रहानं ग्रासलेले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासीयांना संबोधित करताना आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला होता. मोदींच्या या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, मी यापूर्वीच बोललो होतो, देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता आहे. त्यानंतर, चव्हाण यांनी अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी पर्याय सूचवला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, असे ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT