
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काल (ता. १७) रविवारी रात्री त्यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले.
धक्कादायक ! ज्येष्ठ साहित्यिकाचं कोरोनामुळे निधन
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काल (ता. १७) रविवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गेले काही दिवस त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्यांनंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना मुंबईतील सेव्हेन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
----------
लॉकडॉऊन 4:0 च्या गाईडलाईन जाहीर; काय चालू, काय बंद?
---------
महाराष्ट्रातील 'या' ०७ शहरांना लॉकडाऊन 4:0 मध्ये सूट नाहीच
----------
दरम्यान, १९५५ मध्ये त्यांनी वेडी माणसं या एकांकीकेपासून लेखनाची सुरवात केली. त्यावेळी ते अवघे १६ वर्षांचे होते. ती एकांकीका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. त्यानंतर लोककथा ७८, दुभंग, अश्वमेध, माझं काय चुकलं?, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवं, खोल खोल पाणी, इंदिरा अशी मतकरी यांची काही अन्य नाटकं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तसेच अलबत्या गलबत्या आणि निम्मा, शिम्मा राक्षस या लहान मुलांच्या, तसेच आरण्यक या नाटकांनी रंगभूमीवर आपली छाप सोडली. गूढकथा हा कथाप्रकारही त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला. आतापर्यंत त्यांनी मोठ्यांसाठी ७० तर लहान मुलांसाठी २२ नाटकांचं लेखन केलं आहे. गहीरे पाणी, अश्वमेध, बेरीज वजाबाकी, या मालिका लोकांच्या अद्यापही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या इन्वेस्टमेन्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.
रत्नाकर मतकरी यांच्या 'निर्मनुष्य' या कथासंग्रहातील 'भूमिका' या कथेवर त्याच नावाचे मराठी नाटक चिन्मय पटवर्धन यांनी लिहिले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झाला. नाटकाचे दिग्दर्शन गौरव बर्वे यांचे होते. २००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. रत्ना कर मतकरींचा 'रत्ना क्षरं' हा ग्रंथ चार भागांत विभागला गेला आहे. पहिल्या विभागात एक अस्वस्थ कलावंत, एक माणूस कलावंत, मतकरी : लेखन प्रपंच या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या विभागात मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबऱ्या, लेख, कविता, प्रस्तावना, पत्रे, अर्पणपत्रिका या साहित्य-प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या विभागात मान्यवर मंडळींना मतकरी कसे वाटतात यावरील लेखनप्रपंचांचा समावेश करण्यात आला आहे. चौथ्या विभागात मतकरींच्या संपूर्ण साहित्याच्या आणि नाट्यप्रयोगांच्या तपशिलांची दीर्घ सूचीही दिलेली आहे.