esakal | महाराष्ट्रातील 7 शहरांना लॉकडाउन-४ मध्ये सूट नाहीच; देशात 30 शहरं 'लॉक' 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus india lockdown 4 guidelines 30 cities still locked

बारा राज्यांमधील या ३० शहरांमध्ये महानगरांमध्ये मात्र सोशल डिस्टन्सिंगसह सारे नियम यापुढेही अमलात येणार आहेत.

महाराष्ट्रातील 7 शहरांना लॉकडाउन-४ मध्ये सूट नाहीच; देशात 30 शहरं 'लॉक' 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : उद्यापासून (१८ मे) सुरू होणाऱ्या नव्या रंगरूपातील कोरोना लॉकडाउन ४.० मध्ये दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह देशाच्या बारा राज्यांमधील मुंबईसह ३० शहरे आणि महानगरांच्या क्षेत्रांमध्ये लॉकडाऊनचा नियमांमधून कोणतीही सूट मिळणार नाही, असे केंद्र सरकारने आज स्पष्ट केले. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई, ठाणे, पुणेसह महाराष्ट्रातील सर्वाधिक सात जिल्हे आहेत.

आणखी वाचा - लष्कराची गौरवशाली परंपरा आता बंद होणार!

ज्या शहरांमध्ये लॉकडाउन नियम पूर्वीप्रमाणेच जारी राहणार आहेत, त्यांच्याच हद्दीमध्ये देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ८० टक्के कोरोनाग्रस्त असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्यातच लॉकडाउन-४ लागू होणार असे स्पष्ट केले होते. या काळात जेथे कोरोनाचा फारसा उद्रेक नाही, तेथील कृषी आणि आर्थिक व्यवहार तसेच उद्योग पूर्वपदावर करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र बारा राज्यांमधील या ३० शहरांमध्ये महानगरांमध्ये मात्र सोशल डिस्टन्सिंगसह सारे नियम यापुढेही अमलात येणार आहेत.

आणखी वाचा - ही बातमी आशेचा किरण; भारतात औषधाच्या चाचण्या सुरू 

दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगाण, आंध्र प्रदेश, पंजाब तसेच ओडिशा या राज्यांचा यात समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७, तमिळनाडूतील ६ गुजरात आणि राजस्थानातील प्रत्येकी ३, बंगालमधील २, पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशातील प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, आदी सहा राज्यांनी लॉकडाउन या महिनाअखेरपर्यंत वाढवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. 
आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १२ राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्स केली. या मोठ्या शहरांमधील परिस्थिती अशी आहे की लॉकडाउन ४ मध्येही तेथील कोरोना परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निरीक्षण आहे. यांमध्ये सामाजिक उद्रेकाची भीती सर्वाधिक आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यांना मिळणार नाही सूट 

 • राजधानी दिल्ली 
 • महाराष्ट्र : बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, पालघर 
 • तमिळनाडू : चेन्नई, तिरुवल्लूर, कुड्डालोर, चेंगलपट्टू, अरियालुर, विल्लुपुरम 
 • गुजरात : अहमदाबाद, सूरत, बडोदा 
 • राजस्थान : जयपूर, जोधपूर, उदयपूर 
 • पश्चिम बंगाल : कोलकाता, हावडा
 • मध्य प्रदेश : इंदूर, भोपाळ 
 • उत्तर प्रदेश : आग्रा, मेरठ 
 • तेलंगण : हैदराबाद 
 • आंध्र प्रदेश : कुर्नूल 
 • पंजाब : अमृतसर 
 • ओडिशा : बेरहमपूर 
loading image
go to top