Aap Party
Aap Party Sakal
देश

AAP : केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवणार ः आप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली ः दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढल्याने आता ते तिहार तुरुंगातूनच सरकार चालवतील. पुढील आठवड्यात दिल्ली सरकारचे मंत्री तुरुंगात केजरीवाल यांना भेटतील आणि आपल्या कामकाजाचा अहवाल सादर करतील, असे आम आदमी पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी आज तिहार तुरुंगात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार संदीप पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, दिल्ली सरकार तुरुंगातून चालेल. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पुढील आठवड्यांपासून दोन दोन मंत्र्यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यांच्याकडून मंत्रालयांच्या कामकाजाचा अहवाल मुख्यमंत्री केजरीवाल घेतील. यासाठीची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

‘‘तुरुंगात झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या समस्यांबद्दल विचारणा केली. वीजेचा पुरेसा पुरवठा, औषधांची पुरेशी उपलब्धता याबद्दल जाणून घेतल्यानंतर केजरीवाल म्हणाले की पुढील आठवड्यापासून ते प्रत्येकी दोन मंत्र्यांना तुरुंगात बोलावून त्यांच्या कामाचा आढावा घेतील आणि त्यांना मार्गदर्शन करतील,’’ असे संदीप पाठक यांनी सांगितले. यावेळी केजरीवाल यांनी सर्व आमदारांना आपापल्या भागात घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा संदेश दिला असल्याचे ते म्हणाले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर महिलांसाठी १००० रुपयांची सन्मान मदत योजना राबवणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले असल्याचे पाठक म्हणाले.

दिल्ली सरकारचा राजीनामा देणारे मंत्री राजकुमार आनंद यांच्याबाबत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान चर्चा झाली नाही, असेही संदीप पाठक यांनी सांगितले. या संघर्षात कोणतीही व्यक्ती महत्त्वाची नाही. आपण पक्ष फोडू असे कोणाला वाटत असेल तर ते दिवास्वप्न आहे, असाही टोला खासदार पाठक यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA vs PAK : युएसएने इतिहास रचला! मुंबईकर नेत्रावळकरची सुपर ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग, पाकिस्तानचा पराभव

Ajit Pawar on Baramati Result: "बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य"; अजित पवारांची जाहीर कबुली

USA vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

Shooting World Cup : सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी

मोहोळच्या ज्येष्ठ नागरिकाला सोलापूरच्या रिक्षावाल्याने लुटले! कोंडीच्या पेट्रोल पंपावर नेऊन ‘फोन-पे’वरून काढले १.५ लाख रूपये

SCROLL FOR NEXT