Ajit Pawar on Baramati Result: "बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य"; अजित पवारांची जाहीर कबुली

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. याबाबत त्यांच्या पक्षाची आज बैठक पार पडली.
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यापुढे तिहेरी आव्हान पक्षांतर्गत नाराजी
Ajit Pawar esakal

मुंबई : लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. याबाबत त्यांच्या पक्षाची आज बैठक पार पडली. यानंतर अजित पवार आणि नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांनी आपला पराभव मान्य करत बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे, अशी जाहीर कबूली त्यांनी दिली. (Ajit Pawar on Baramati Lok Sabha Result he is accepted his defeat in Baramati)

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यापुढे तिहेरी आव्हान पक्षांतर्गत नाराजी
Kangna Ranaut: कानशिलात लगावल्याच्या घटनेवर कंगनाचं स्पष्टीकरण; म्हणाली, पंजाबमध्ये दहशतवाद वाढतोय...

संभाजीनगर सोडलं तर एकही जागा मराठवाड्यात महायुतीला मिळाली नाही. या दोन-तीन गोष्टींचा फटका आम्हाला बसला, हे मान्यच करावं लागेल. लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्विकारतो. आमच्यावरचा जनतेचा विश्वास कमी झालेला आहे, तो पुन्हा मिळवण्यासाठी जीवाचं रान करु. माझ्या स्वतः मुळं हे अपयश आलेलं आहे त्यामुळं यामध्ये दुसऱ्याला मला दोष द्यायचा नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यापुढे तिहेरी आव्हान पक्षांतर्गत नाराजी
Rahul Gandhi on Stock Market : "खोटे एक्झिट पोल दाखवायला सांगून मोदींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सांगितली"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

आजच्या आमच्या बैठकीत काही आमदार उपस्थित राहू शकले नाहीत कारण त्यांच्या काही अडचणी होत्या. पण बाकी सर्वजण हजर होते त्यावरुन आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत हे आजच्या बैठकीवरुन लक्षात आलं आहे. त्यामुळं विरोधक जे बोलले की त्यांच्या संपर्कात आमचे ‌आमदार आहे, हे काही खरं नाही. आता उद्याच्या विधानसभेला नाउमेद न होता सामोरं जायचं आहे, आमची महायुती आहे. लोकसभेच्या ४८ जागांपैकी वाटप करताना काय त्रृटी झाल्याचा आम्ही विचार करु, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यापुढे तिहेरी आव्हान पक्षांतर्गत नाराजी
BJP Big Loss Five States: भाजपची 400 पारची घोषणा ठरली फेल! 'या' पाच राज्यांनी केला गेम

दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच्या दारुन पराभवाची जबाबदारी स्विकारत राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे, यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, याबाबत मी त्यांच्याशी बोललो आहे यावर आपण उद्या बोलू असं फडणवीसांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com