Laluprasad Yadav sakal
देश

Lalu Prasad Yadav : भविष्यामध्ये तुमचे काय हाल होणार?

जमिनीच्या बदल्यात नोकरी गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने आरेापपत्र दाखल केल्यानंतर राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तीव्र टीका केली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पाटणा - जमिनीच्या बदल्यात नोकरी गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने आरेापपत्र दाखल केल्यानंतर राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तीव्र टीका केली. ‘तुमचे भविष्यात काय हाल होतील? याचा जरा विचार करा. आम्ही फुल, हार विकून जगू. तुम्ही फक्त खटला खटला करा आणि एवढेच सध्या घडत आहे. २०२४ ला आम्ही मुळासकट फेकू’, असा इशारा लालूप्रसाद यादव यांनी यावेळी दिला.

लालूप्रसाद यादव यांनी भोजपूरी भाषेत भाषण केले. भाषणात त्यांनी महागाईचा मुद्दा मांडला. देशातील बंधूभाव संकटात आहे. आपले दिवस संपतील तेव्हा आपले (मोदी) काय होणार? आम्हाला किमान सहानुभूती आहे आणि आजही आमच्यावर फुलांचा आणि हारांचा वर्षाव होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

राजदच्या २७ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात लालू प्रसाद यादव (वय ७०) हे खुर्चीवर बसूनच बोलत होते. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधी ऐक्याबाबत केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला मुळासकट फेकण्याचा संकल्प केला. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचा उल्लेख करत त्यांनी भाजपवर ‘घोडेबाजार’ केल्याचा आरोप केला.

कर्नाटकातील भाजपच्या पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले, की कर्नाटक तर ही एक झलक आहे आणि खरा सिनेमा पुढेच दिसेल. बिहारमध्ये महाआघाडी हे विरोधकांच्या ऐक्याचे आदर्श उदाहरण आहे. जातीय व्यवस्था व आरक्षण व्यवस्था संपविणाऱ्यांविरुद्ध संघर्ष करण्यावर ठाम राहा, असे आवाहन लालूप्रसाद यादव यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT