Latest Marathi News Live Update
esakal
पुणे शहरातील ज्येष्ठ उद्योजक, सामाजिक भान जपणारे उद्योगपती आणि रांका ज्वेलर्सचे ओमप्रकाश रांका यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, दोन मुली, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात रांका यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आणि सक्रिय म्हणून ओळखले जात होते.