Bjp Mla Sangeet Som
Bjp Mla Sangeet Som 
देश

...तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता: भाजप नेता

वृत्तसंस्था

लखनौः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यावेळी विमान जर थोडावेळ तिथे थांबले असते तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता, असे भारतीय जनता पक्षाचे नेते संगीत सोम यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमधील शामली येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यान बोलताना संगीत सोम म्हणाले, 'बालाकोटमध्ये जेथे आपले हवाई दल पोहचले ते ठिकाण लाहोरपासून खूप जवळ आहे. मित्रांनो, ते ठिकाण एवढे जवळ आहे की, दोन मिनिट आणखी तेथे थांबलो असतो तर तिरंगा लाहोरमध्येही फडकला असता.'

संगीत सोम यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरधना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असलेले आमदार सोम हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. सोम यांचे नाव 2013 मध्ये मुझफ्फरनगर दंगलीत आले होते. प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक नेते आपल्या भाषणात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचा मुद्दा भाषणात उपस्थित करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

SCROLL FOR NEXT