sakshi maharaj
sakshi maharaj 
देश

Loksabha 2019 : उमेदवारी द्या अन्यथा वाईट परिणाम: साक्षी महाराज

वृत्तसंस्था

उन्नाव (उत्तर प्रदेश) : चिथावणीखोर वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे फायरब्रॅंड नेते साक्षी महाराज यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून थेट पक्ष नेतृत्वावरच निशाणा साधला आहे. पक्षाने आपल्याला पुन्हा उमेदवारी दिली नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

साक्षी महाराज यांनी या संदर्भात सात मार्च रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांना पत्र लिहिले असून, ते सोशल आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. उन्नावमधून अन्य उमेदवाराच्या नावाचा विचार झाल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, येथून सलग चार वेळा निवडून येणाऱ्या साक्षी महाराजांनी याखेपेसही आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींवर दबाव आणला आहे. साक्षी महाराज यांनी लिहिलेले पत्र माध्यमांमध्ये व्हायरल झाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे, याबाबत पत्रकारांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, की मलाही याबाबत काही माहिती नाही या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हायला हवी.

पत्रातील दावा
निवडणुकीत आपण याच मतदारसंघातून सव्वातीन लाख मतांच्या फरकाने विजयी झालो आहोत. येथे समाजवादी पक्षही दुसऱ्या स्थानावर फेकला गेला होता, तर कॉंग्रेस आणि बसप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते, असे साक्षी महाराज यांनी प्रदेशाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT