Congress
Congress 
देश

Loksabha 2019 : ...तर भाजपला काँग्रेस थोपवू शकते!

शेखर गुप्ता

लोकसभा निवडणुकीच्या निर्णायक टप्प्याला सुरवात झाली असून, सुमारे १५० मतदारसंघांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट मुकाबला आहे. काँग्रेसला एकाच वेळी भाजपशी आणि स्वतःशीही लढावे लागते आहे. असंख्य दिव्यांचा प्रकाश पाहून भांबावलेल्या सशासारखी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे काँग्रेसच्या सध्याच्या सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला २०१४ च्या तुलनेत तिप्पट जागा मिळतील असा अंदाज कमलनाथ यांनी नुकताच वर्तविला आहे. काँग्रेसच्या डेटा विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनीही हाच दावा केला आहे. काँग्रेसला मागील लोकसभेच्या तुलनेत तिप्पट जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी यांना सत्तेबाहेर ठेवण्यास त्या पुरेशा ठरतील, असे कमलनाथ यांचे म्हणणे आहे. 

कमलनाथ यांच्या या दाव्यावर भाजपकडून प्रतिक्रिया आल्याच. मात्र काँग्रेस समर्थकांनीही या दाव्याबाबत मतप्रदर्शन केले. सरकार स्थापन करता येईल एवढ्या जागा मिळतील, अशी अपेक्षा करणे वेडेपणा ठरेल, असे अनेक काँग्रेस समर्थकांचे म्हणणे होते. ४४च्या तिप्पट म्हणजे १३२ जागा. काँग्रेसने जर १३२ जागांचे लक्ष्य ठेवले असेल, तर त्यांना कशाबशा शंभर जागा मिळू शकतील. मात्र अशा प्रकारे निवडणूक प्रचाराच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर अशा प्रकारचा विचार या पक्षाची पराभूत मानसिकता दाखवून देतो. 

काँग्रेस नेत्यांच्या या दाव्यावर घेतले जाणारे आक्षेप राजकीयदृष्ट्या तितकेसे बरोबर नाहीत. जर भाजपला २०० जागांपर्यंत पोचता आहे, तर तो पक्ष सरकार स्थापन करणार हे निश्‍चित. भाजपला जर दुसरी टर्म मिळू देण्यापासून रोखायचे असेल, तर त्या पक्षाला २०० जागांच्या आतच रोखायला हवे. काँग्रेसला तीन आकडी संख्या गाठण्यात यश मिळाले, तर भाजपला २०० पेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागणार आहे. 

काँग्रेस नेत्यांच्या दाव्याप्रमाणे २०१४च्या तुलनेत तिप्पट म्हणजे १३२ जागा मिळाल्या, तर मोदींची दुसरी टर्म गेली असे समजावे लागेल. २००४मध्ये १३२ पेक्षा डझनभर जागांच्या बळावर काँग्रेसने यूपीए-२ची यशस्वी जुळणी केली होती, हे येथे ध्यानात घ्यावे लागले. असे प्रत्यक्षात होईलच असे नाही. मात्र काँग्रेसने फक्त १३२ जागांचे उद्दिष्ट ठेवू नये, एवढेच मला म्हणायचे आहे.
२०१४ची आकडेवारी पाहिल्यास असे दिसते, की भाजपला मिळालेल्या २८२ जागांपैकी १६७ जागा अशा आहेत जिथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती.

थोडक्‍यात, काँग्रेसच्या जागा २०६ वरून थेट ४४ वर आणून त्या पक्षाचे शक्‍य तेवढे नुकसान करण्यावरच मोदी लाट अवलंबून होती. काँग्रेसच्या हातातून निसटलेल्या या जागा भाजपकडे आल्या होत्या. भाजपने उत्तर प्रदेशात सप आणि बसपच्या ३८ जागा स्वतःकडे घेण्यात यश मिळविले होते. त्यामुळे जर काँग्रेसला शंभरचा टप्पा पार करायचा असले, तर भाजपकडून त्यांना सुमारे ६० जागा हिसकावून घ्यावा लागतील. 

काँग्रेसला ज्या ४४ जागा मिळाल्या होत्या त्या नेमक्‍या कुठल्या आहेत हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. या सर्व जागा सोळा राज्यांमध्ये विखुरलेल्या आहेत. या जागा त्या त्या ठिकाणच्या नेत्याने वैयक्तित ताकदीवर जिंकल्या होत्या. कर्नाटकमध्ये दहा आणि केरळमध्ये सात जागा काँग्रेला मिळाल्या होत्या. म्हणजे ४४ पैकी २७ जागा १४ राज्यांमधील आहेत. 

ज्या ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती, अशा १६७ पैकी १४ जागांवर भाजपपेक्षा अवघी दहा टक्के मते कमी मिळाली होती. तर सहा ठिकाणी दहा ते पंधरा टक्‍क्‍यांच्या दरम्यान मतांच्या टक्केवारीतील फरक होता. मोठा बदल घडवून आणण्यासाठी दहा टक्के मतेही पुरेशी ठरतात असे कुठलाही सेफालॉजिस्ट तुम्हाला सांगेल. 

छत्तिसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. याचा विचार केल्यास या तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. या तीन राज्यांत प्रत्येकी ३० जागा काँग्रेसला मिळवणे आवश्‍यक आहे.

छत्तिसगडमध्ये काँग्रेसला मोठी आघाडी मिळू शकते, मात्र मध्य प्रदेश आणि राजस्थानात या पक्षाला प्रत्येकी २५ जागा मिळतील, असे म्हणणे जरा धाडसाचे ठरेल. 

काँग्रेसला शंभर जागांच्या आत रोखणे भाजपसाठी जेवढे आवश्‍यक आहेत, तेवढेच भाजपला दोनशेच्या आत रोखणे काँग्रेससाठी गरजेचे बनले आहे. आपल्याला सत्तेपासून दूर ठेवण्याची ताकद एकट्या काँग्रेसमध्येच आहे, हे मोदी-शहा यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच मोदींच्या प्रचारमोहिमेत सदैव काँग्रेसला मुख्य लक्ष्य केले जाते. 

काँग्रेसला १३२ जागा मिळाल्यास मोदींना दुसरी टर्म मिळणार नाही, असे दिसत असले, तरी या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस तेवढी सज्ज आहे का याचाही विचार व्हायला हवा. मोठे यश प्राप्त करण्यासाठी काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर तेवढी तयारी केली आहे का, हाही महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

देवीलाल यांच्याबरोबर प्रवास करण्याचा एकदा योग आला होता. त्या वेळी एका सशाला वाचविण्यासाठी चालकाने तत्काळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर भांबावलेला सशा मोटारीच्या चाकाखाली आला. त्या वेळी देवीलाल यांनी एक आठवण सांगितली होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग कैराँ यांच्याबाबतही असा प्रसंग झाला होता. गाडीच्या चाकाखाली सापडून ससा ठार झाल्यानंतर कैराँ हे देवीलाल यांना उद्देशून म्हणाले होते, की तुम्ही पाहा, नेहरूंच्या बाबतीतही असेच काहीसे होईल. कधी डावीकडे, कधी उजवीकडे असे केल्यास सर्वांचाच घात होईल हे निश्‍चित. 

देवीलाल यांनी सांगितलेला किस्सा काँग्रेसला लागू करून पाहू. तृणमूलपासून, सप-बसपपर्यंत आणि तेलंगणातील केसीआर यांच्यापासून ओडिशातील नवीन पटनाईक यांच्यापर्यंत, दिल्लीत ‘आप’बरोबरही सलगी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. एकूण काय तर भांबावलेल्या सशासारखी काँग्रेसची स्थिती झालेली दिसते.
(अनुवाद  अशोक जावळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT