loksabha Election 2024  
देश

loksabha Election 2024 : नरेंद्र मोदींचे लक्ष महाराष्ट्र, गोवा! सर्व खासदारांची दिल्लीत घेणार शाळा

Sandip Kapde

loksabha Election 2024:  महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान क्लस्टर बैठका घेत आहेत. आज महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदारांची एकत्रित बैठक आहे. सायंकाळी 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित राहणार आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस देखील भाजपसोबत असेल.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नरेंद्र मोदी या क्लस्टर बैठका घेत आहेत. भाजप प्रत्येक राज्यासाठी वेगळे नियोजन करत आहे. आज नरेंद्र मोदी काय रणनिती ठरवणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. आजच्या बैठकीत अजित पवार गटाचे खासदार देखील सहभागी होणार आहे.

नरेंद्र मोदी एनडीएच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व 430 खासदारांना भेटणार आहेत. नरेंद्र मोदी विविध गटातील सर्व खासदारांना भेटणार आहेत. यामध्ये ते नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या खासदारांची भेट घेत आहेत.

नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या खासदारांनाही भेटणार आहेत. यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT