Raghav Chadha News : राघव चड्ढांच्या अडचणीत वाढ! राज्यसभेच्या ५ खासदारांकडून हक्कभंग प्रस्तावाची मागणी; काय आहे प्रकरण?

 Raghav Chadha
Raghav Chadha e sakal

नवी दिल्ली : लोकसभेत मंजूर झाल्यानंतर अखेर 'दिल्ली सेवा विधेयक' राज्यसभेतही मंजूर झालं. यादरम्यान राज्यसभेत आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांच्या अडचणी मात्र वाढताना दिसत आहे. सोमवारी खासदार राघव चड्ढा यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी राज्यसभेच्या ५ खासदारांनी केली आहे

हा हक्कभंगाचा प्रस्ताव भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी आणि नरहरी अमीन आणू शकतात. राघव चड्ढा यांनी दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवलेल्या प्रस्तावात सस्मित पात्रा, नरहरी अमीन, थंबीदुराई, सुधांशू त्रिवेदी आणि नागालँडचे राज्यसभा खासदार फांगनॉन कोन्याक यांच्या नावांचा त्यांच्या परवानगीशिवाय समावेश केल्याचा आरोप आहे. यापैकी काही खासदारांनी सोमवारी रात्री सभागृहाच्या कामकाजात आपण त्या प्रस्तावर आपण स्वाक्षरीही केली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राघव चड्ढांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 Raghav Chadha
माजी CJI रंजन गोगोईंनी पहिल्यांदाच केलं राज्यसभेत भाषण; 4 महिला खासदारांनी केलं वॉकआऊट

काय म्हणाले राघव चड्ढा?

संसद सदस्यांची नावे त्यांच्या संमतीशिवाय घेणे हे संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन आहे. यावर राघव चढ्ढा यांनी तशी नोटीस येऊ द्या, मी उत्तर देईन असं उत्तर दिलं आहे. राघव चढ्ढा म्हणाले की, या विधेयकावरून संसदेत आमचा पराभव झाला, पण न्यायालयात लढू. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने निकाल देईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी उपसभापतींकडे केली आहे. शाह म्हणाले की, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी या दोन सदस्यांनी राघव चढ्ढा यांनी मांडलेल्या ठरावावर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत त्यांची स्वाक्षरी कोणी केली याचा तपास व्हायला हवा, असे शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, जेव्हा या खासदारांनी स्वाक्षरीही केली नाही, तेव्हा ती कोणी सही केली. संसदेतही फसवणूक होत आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवावे, असेही ते म्हणाले. यासंदर्भात राज्यसभेच्या चार सदस्यांनी उपसभापतींकडे आपली तक्रार पाठवली आहे. या संपूर्ण विषयाची चौकशी केली जाईल, असे उपसभापतींनी स्पष्ट केलं.

 Raghav Chadha
Gyanvapi Masjid : मंदिराखालचं तळघर अन् बेपत्ता राणी...; 'ज्ञानवापी'बद्दल काँग्रेस अध्यक्षांनी लिहिलेली गोष्ट नेमाडेंनी सांगितली

नेमकं काय झालं?

सोमवारी रात्री राज्यसभेच्या कामकाजादरम्यान थंबीदुराई, सस्मित पात्रा आणि फांगनॉन कोन्याक यांनी सभागृहात सांगितले की, आम्ही कोणत्याही प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही. या खासदारांनी आरोप केला आहे. दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्यासाठी आप खासदारा राघव चड्ढा यांनी मांडलेल्या ठरावावर त्यांनी खोट्या सह्या केल्या आहेत.

अन्नाद्रमुकचे खासदार एम. थंबीदुराई म्हणाले त्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना याबद्दल पत्र दिले आहे. थंबीदुराई यांनी त्यांची स्वाक्षरी बनावट असल्याची भीती व्यक्त केली आहे. बिजू जनता दलाचे खासदार डॉ. सस्मित पात्रा यांनी अशीच तक्रार केली आहे. राघव चढ्ढा यांनी मांडलेल्या ठरावात माझ्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. माझ्या संमतीशिवाय माझ्या नावाचा प्रस्तावात समावेश केला जाऊ शकत नाही असे त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com