देश

मालेगाव बॉम्बस्फोट; प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यावर दहशतवादी कट रचल्याचा आरोप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य सात जणांवर दहशतवादी कट रचणे आणि हत्येचे आरोप निश्चित करण्यात आले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला केली जाणार आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित आणि इतर काही जणांविरोधात आरोप निश्चिती थांबविण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर आता कर्नल पुरोहित आणि साध्वी ठाकूर यांच्यासह अन्य सात जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. 

''राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मला नुकतीच क्लिन चिट दिली होती. मात्र, आता याबाबत माझ्याविरोधात खटले दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे काँग्रेसचे एक षड्यंत्र आहे. मात्र, आता मला विश्वास आहे, मी निर्दोषमुक्त होईन आणि सत्याचा नेहमी विजय होईल'', असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT