madras high court 
देश

पत्नीने मंगळसूत्र काढणं ही सर्वोच्च पातळीवरील मानसिक क्रूरता : हायकोर्ट

याप्रकरणी न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर केला आहे.

चेन्नई - एखाद्या पुरुषाची पत्नी ही त्याच्यापासून विभक्त राहत असेल आणि तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले असेल तर ते पतीसाठी मानसिक क्रौर्य समजले जाईल, असं मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर केला आहे. न्यायमूर्ती व्हीएम वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस. साँथर यांच्या खंडपीठाने इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले आहे.

दरम्यान, पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण बनले 'मंगळसूत्र' बनले असून यासंबंथधित मद्रास हायकोर्टाकडून पतीची याचिका मंजूर झाली आहे. स्थानिक कौटुंबिक न्यायालयाचा 15 जून 2016 रोजीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता त्यामुळे याप्रकरणी महिलेची चौकशी केल. यावेळी तिने कबूल केले की, विभक्त होण्याच्या वेळी तिने तिच्या लग्नाचे प्रतीक म्हणून एक सोन्याची साखळी घातली होती. मात्र आता त्या महिलेने ती साखळी काढून टाकली आहे.

दरम्यान, मी केवळ साखळी काढून ते सोन्याचे प्रतिक ठेवले असल्याचे त्या महिलेने स्पष्ट केले आहे. महिलेच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा पुरावा देत सांगितलं आहे की, गळ्यात तो सोन्याचा ऐवज घालण्याची आवश्यक नाही आणि त्यामुळे त्या महिलेने तो काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT