हे 'दोन' शेअर्स देतील तगडा परतावा, दिग्गजांना विश्वास...

जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या दोन्ही शेअर्समध्ये आणखी हिस्सा वाढवला आहे.
share market update
share market updategoogle
Summary

जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या दोन्ही शेअर्समध्ये आणखी हिस्सा वाढवला आहे.

दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांना गेल्या वर्षभरात दोन शेअर्सने तगडा परतावा दिला आहे. या दोन शेअर्समध्ये अजिंठा सोया (Ajanta Soya) आणि टिन्ना रबर अँडड इन्फ्रास्ट्रक्चर (Tinna Rubber and Infrastructure) यांचा समावेश आहे. डॉली खन्ना यांनी जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या दोन्ही शेअर्समध्ये आणखी हिस्सा वाढवला आहे.

दोन शेअर्समध्ये वाढ

डॉली खन्ना यांनी एप्रिल-जून 2022 या तिमाहीत त्याच्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेत. या तिमाहीत, त्यांनी पोर्टफोलिओमध्ये दोन नवे शेअर्स जोडले, 10 शेअर्समधील त्याचे होल्डिंग कमी केले आणि दोन शेअर्समधील त्याचे होल्डिंग रद्द केले. मात्र, डॉली खन्ना यांनी अजिंठा सोया (Ajanta Soya) आणि टिन्ना रबर अँडड इन्फ्रास्ट्रक्चर (Tinna Rubber and Infrastructure) या दोन शेअर्समध्ये आपला स्टेक वाढवला आहे.

share market update
NSEच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना EDकडून अटक

किती टक्के वाढ

खन्ना यांनी टिन्ना रबरमधील त्यांची भागीदारी 1.60 टक्क्यांवरून 1.93 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे, तर अजिंठा सोयामधील त्यांची भागीदारी 1.46 टक्क्यांवरून 1.53 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत टिन्ना रबरच्या शेअरहोल्डिंगनुसार, डॉली खन्ना यांच्याकडे कंपनीमध्ये 1,56,861 शेअर्स म्हणजेच 1.83 टक्के हिस्सा आहे.

दोन्ही शेअर्सचा मल्टीबॅगर परतावा

गेल्या वर्षभरात टिना रबर शेअर 100 रुपयांनी वाढून सुमारे 330 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, या कालावधीत स्टॉकने सुमारे 258% परतावा दिला आहे. त्याचबरोबर अजिंठा सोयाचा शेअर 22 रुपयांवरून 50 रुपयांच्या आसपास वाढला आहे. म्हणजेच एका वर्षात स्टॉकने सुमारे 125 टक्के परतावा दिला आहे.

share market update
Share Market: शेअर बाजारात आजही अस्थिरता, विक्रीवर दबाव कायम

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com