File photo
File photo 
देश

''अहमद पटेलांनी दिली दहशतवाद्याला नोकरी''

महेश शहा

अहमदाबाद : पाटीदार नेते नरेंद्र पटेल यांनी भाजपवर लाच देण्याचा आरोप केल्यामुळे धक्का बसलेल्या भाजपने आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांनी 'इसिस'च्या दहशतवाद्याला आश्रय दिल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.

पटेल यांनी मात्र आपल्यावरील हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावत भाजपवर टीका केली आहे. 

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षांमध्ये जोरदार वाक्‌युद्ध सुरू आहे. पाटीदार नेत्यांना फोडण्यासाठी भाजपने एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप पाटीदार नेते नरेंद्र पटेल यांनी केल्यानंतर राज्य सरकार आणि भाजप हबकले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पिछाडीवर पडणे भाजपला मान्य नसल्याने त्यांनी काँग्रेसवरही आरोप केले आहेत. गुजरात एटीएस पथकाने सूरतमध्ये अटक केलेल्या 'इसिस'च्या दोन दहशतवाद्यांपैकी कासिम टिंबरवाला याला काँग्रेस खासदार अहमद पटेल यांनीच अंकलेश्‍वर रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नोकरी लावून दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. हा आरोप खुद्द मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीच पत्रकार परिषद घेत केला आहे. अहमद पटेल यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणीही रूपानी यांनी केली आहे. 

अहमद पटेल यांनी मात्र हा आरोप खोडसाळपणाचा असल्याचे म्हटले आहे. 'भाजपचे आरोप आधारहिन आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांचा वापर राजकीय कारणांसाठी करणे चुकीचे आहे. एका बाजूला दहशतवादाशी लढत असतानाच नागरिकांमध्ये फूट पाडू नये,' असे पटेल यांनी ट्‌विटरवर सांगितले. संबंधित रुग्णालयानेही हे आरोप चुकीचे असल्याचे जाहीर केले आहे. 'कासिम याने स्वत:हून राजीनामा दिला होता. त्याच्या वैयक्तिक बाबींबाबत रुग्णालयाकडे काहीही माहिती नाही. अहमद पटेल हे रुग्णालयाच्या दैनंदिन कारभाराशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसून त्यांनी केवळ येथे आरोग्य सुविधा उभारण्यासाठी योगदान दिल्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. 

गुजरातमध्ये पराभूत होण्याच्या भीतीनेच भाजपचे अपयशी मुख्यमंत्री असे आधारहिन आरोप करत आहेत. अहमद पटेल आणि त्यांचे कुटुंबीयही संबंधित रुग्णालयाचे विश्‍वस्त नाहीत अथवा कोणत्याही प्रकारे संबंधित नाहीत. 
- रणदीप सूरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : दोन हेवी वेट संघ भिडणार, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

SCROLL FOR NEXT