Hardik Patel
Hardik Patel 
देश

'त्या' व्हिडिओवरून हार्दिक टाकणार भाजपविरोधात 'मोठा बॉम्ब'

वृत्तसंस्था

गांधीनगर (गुजरात): पाटीदार समाजाच्या रॅलीला परवानगी नाकारल्यानंतरही पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या वतीने मानसा येथे आज (शनिवार) संध्याकाळी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीदरम्यान पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या कथित सेक्स सीडीप्रकरणी 'मोठा बॉम्ब' टाकणार असल्याने सत्ताधारी भाजपसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल याचे कथित सेक्स सीडीप्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे त्याच्यावर भाजपकडून निशाणा साधला जात असताना आज पाटीदार अनामत आंदोलन समितीकडून रॅलीसाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्या रॅलीला परवानगी नाकारल्याने ही रॅली पोलिसांच्या परवानगीसह किंवा परवानगीशिवाय काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

"आमच्या रॅलीसाठी प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी पाटीदार समाजाच्या वतीने मानसा जिल्ह्यात 'प्रतिष्ठा रॅली' काढण्यात येणार आहे. या रॅलीदरम्यान माझ्याविरोधातील कथित सेक्स सीडीबाबत सत्ताधारी भाजपविरोधात आम्ही 'मोठा बॉम्ब' टाकणार आहोत", असे पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने सांगितले. 

दरम्यान, मानसा हे गाव अहमदाबादपासून 41 किमी दूर असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच याच ठिकाणी 2015 साली पाटीदार समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT