National News Politics Rahul Gandhi Criticizes PM Modi
National News Politics Rahul Gandhi Criticizes PM Modi 
देश

पीएनबी गैरव्यवहारावर पंतप्रधान गप्प का ? ; राहुल गांधींचा सवाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार आणि राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ''देशात झालेला पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार आणि राफेल करारावर पंतप्रधान मोदी कोणतेही भाष्य का करत नाहीत, ते गप्प का आहेत'', असा सवाल राहुल गांधींनी यावेळी केला. 

नुकत्याच झालेल्या पीएनबी गैरव्यवहार आणि राफेल करारावरून पंतप्रधान मोदींवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. पीएनबी आणि राफेल करारावर मोदींनी बोलायला हवे. ते गप्प का आहेत. तसेच यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या 'मन की बात' या कार्यक्रमावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''पंतप्रधान मोदी ऑल इंडिया रेडिओवर भाषण करतात. मात्र, हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि राफेल गैरव्यवहारावर काहीही बोलत नाहीत.

मोदीजी मागील महिन्यात तुम्ही माझ्या सुचनांकडे दुर्लक्ष केले. तुम्ही यावर काहीच बोलत नाही. नीरव मोदी यांनी 22000 कोटींची लूट केली तर 58000 कोटींचा राफेल करारात गैरव्यवहार झाला, या सर्वांवर ते गप्प का आहेत, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT