Security forces successfully neutralized Naxalite leader Modem Balakrishna, carrying a bounty of ₹1 crore.

 

esakal

देश

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Naxalite encounter : छत्तीसगडमधील गरियाबंद येथे झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी मारले गेले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Naxalite leader Modem Balakrishna News : नक्षलवादाचे समूळ उच्चाटण करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून सुरू असलेल्या मोहीमेला आज मोठं यश मिळालं आहे. कारण,  छत्तीसगडमधील गरियाबंद येथे झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी मारले गेले. एवढच नाहीतर या ठार झालेल्या दहा नक्षलवाद्यांमध्ये १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला कमांडर मॉडेम बालकृष्ण याचाही समावेश होता. तो ठार झाल्याने आता नक्षलवाद्यांना मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आपण मॉडेम बालकृष्ण नेमका कोण होता आणि नक्षलवाद्यांसाठी तो का महत्त्वाचा होता, हे आपण जाणून घेऊया.

आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी बालकृष्ण हा जवळजवळ दोन दशकांपासून बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा भाग होता. तो केकेबीएन विभागाचे नेतृत्व करत होता आणि संघटनेच्या विस्तार रणनीतीचा आणि मोठ्या हल्ल्यांच्या नियोजनाचा मुख्य अंमलबजावणी करणारा मानला जात होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामुळे त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचा इनाम जाहीर करण्यात आला होता.

 तीन महिन्यांपूर्वी नक्षली म्होरक्या बसवराजू चकमकीत मारला गेल्यापासून मॉडेम बालकृष्ण मुख्य भूमिकेत होता. म्हणूनच आता या चकमकीत बालकृष्ण मारला गेल्याने नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच बालकृष्णची भयानक प्रतिमा आणि नक्षलवादी कारवायांमध्ये प्रभावशाली भूमिका यामुळे तो सुरक्षा यंत्रणांसाठी मोठा धोका बनला होता. तो यापूर्वी नक्षलवाद्यांच्या ओडिशा राज्य समितीचा सचिव होता आणि अनेक नक्षलवादी हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचेही म्हटले जात होते.

  तो बराच काळ फरार होता आणि आजारी असल्याचेही म्हटले जात होते. म्हणून जानेवारी २०२५ मध्ये, ओडिशा पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली होती. यावेळी काही माओवाद्यांच्या आत्मसमर्पणादरम्यान, बालकृष्णचे नाव इनामी नक्षलवादी म्हणूनही पुढे आले होते.

पोलिस सूत्रांनुसार, जेव्हा चकमक सुरू झाली तेव्हा मॉडेम बालकृष्ण गरियाबंद मार्गे ओडिशाला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, सुरक्षा दलांनी त्याला घेरले आणि तो पळून जाऊ शकला नाही. अशीही माहिती समोर आली आहे की, मॉडेम बालकृष्ण हा तब्बल ३५ वर्षांपासून सक्रिय होता आणि तो नक्षलवादी केंद्रीय समितीचा सदस्य देखील होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT