Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Major Terrorist Module Busted in India : स्फोट रसायने, बॉम्ब बनवण्याच्या साहित्यासह शस्त्रही हस्तगत करण्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला आलं यश
Terrorist module exposed, raids in five states

Terrorist module exposed, raids in five states

esakal

Updated on

Raids Conducted Across Five States: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईअंतर्गत दिल्ली, मुंबई आणि झारखंडसह पाच राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे.  ज्यामध्ये आतापर्यंत एकूण पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.

मूळचे मुंबईचे असणाऱ्या सुफियान आणि आफताब नावाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दोघांच्या मुंबईत लपण्याच्या ठिकाणांवरही छापे टाकले आहेत. एवढंच नाहीतर पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि आयईडी बनवण्याचे साहित्यही जप्त केलं आहे.

याशिवाय झारखंडमधील रांची येथून अशर दानिशला अटक करण्यात यश आलं आहे. त्याच्याही लपण्याच्या ठिकाणावरून हानीकारक रसायनं आणि आयईडी बनवण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे.

Terrorist module exposed, raids in five states
Kulman Ghising : नेपाळ सरकारने सहा महिन्यांपूर्वी बडतर्फ केलेले कुलमन घीसिंग आता थेट पंतप्रधान बनणार?

याचबरोबर , दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल,  झारखंड दहशतवाद विरोधी पथक आणि रांची पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत इस्लामिक स्टेटच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. बोकारो येथील रहिवासी असलेल्या मुख्य आरोपी अशर दानिशला बुधवारीच रांची येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Terrorist module exposed, raids in five states
Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इस्लामिक स्टेट संबंधित मॉड्यूलशी संबंधित एका गुन्ह्यात तो हवा होता. सर्व पथकांनी एकाच वेळी केलेल्या समन्वित कारवाईत आफताब नावाच्या आणखी एका संशयिताला दिल्लीमधूनच अटक करण्यात आली. तर प्राप्त माहितीनुसार वेगवेगळ्या राज्यांमधून किमान आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि संयुक्त पथक त्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com