Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

CRPF letter to Congress President Mallikarjun Kharge : सीआरपीएफचे व्हीव्हीआयपी सुरक्षा प्रमुख सुनील जून यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना पत्र पाठवले आहे, जाणून घ्या काय म्हटलं आहे?
CRPF’s letter to Congress President Mallikarjun Kharge highlights security protocol violations during Rahul Gandhi’s six foreign tours in nine months.

CRPF’s letter to Congress President Mallikarjun Kharge highlights security protocol violations during Rahul Gandhi’s six foreign tours in nine months.

esakal

Updated on

CRPF letter highlights Rahul Gandhi security protocol violations during foreign tours : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्याकडून सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

राहुल गांधींकडून वारंवार सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन होत असल्याने सीआरपीएफने चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवरच सीआरपीएफचे व्हीव्हीआयपी सुरक्षा प्रमुख सुनील जून यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना पत्र पाठवले आहे.

सुनील जून यांनी लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींवर सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न करण्याचा आणि अनेक वेळा त्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच, त्यांनी असाही दावा केला आहे की, रायबरेलीचे खासदार व्हीव्हीआयपी प्रोफाइल असलेले राजकीय व्यक्तिमत्व असूनही त्यांची सुरक्षा गांभीर्याने घेत नाहीत.

CRPF’s letter to Congress President Mallikarjun Kharge highlights security protocol violations during Rahul Gandhi’s six foreign tours in nine months.
Kulman Ghising : नेपाळ सरकारने सहा महिन्यांपूर्वी बडतर्फ केलेले कुलमन घीसिंग आता थेट पंतप्रधान बनणार?

राहुल गांधी यांच्या रायबरेलीच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेच्या उल्लंघनानंतर हे प्रकरण समोर आले आहे. याशिवाय, राहुल गांधींच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांबद्दलही सीआरपीएफ प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे. या दौऱ्यांबाबत त्यांच्या सुरक्षा पथकाला आधी कळवले जात नाही, असे सीआरपीएफकडून सांगितले गेले आहे.

पत्रात म्हटले आहे की, "मागील ९ महिन्यांत राहुल गांधी यांनी ६ परदेश दौऱ्यांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केले. हे सर्व ६ परदेश दौरे सुरक्षा एजन्सीला न कळवता केले गेले, ज्यामुळे सुरक्षा एजन्सीला मोठ्या अडचणी आल्या.’’

CRPF’s letter to Congress President Mallikarjun Kharge highlights security protocol violations during Rahul Gandhi’s six foreign tours in nine months.
Kulman Ghising : नेपाळचे 'पॉवर मॅन', कुलमन घीसिंग आहेत तरी कोण? भावी पंतप्रधान म्हणून आले आहेत चर्चेत

राहुल गांधी व्हीव्हीआयपी श्रेणीत येतात आणि त्यांना झेड+ सुरक्षा कवच मिळते. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, झेड+ एएसएल सुरक्षा लाभणाऱ्या त्यांच्यासारख्या व्हीव्हीआयपी व्यक्तींना परदेश दौऱ्याच्या १५ दिवस आधी त्यांच्या सुरक्षा एजन्सीला माहिती द्यावी लागते, परंतु काँग्रेसकडून तसे न झाल्याचे समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com