Mahua Moitra On Booster Dose google
देश

'मोदींनी माझं ऐकलं', बूस्टर डोसच्या घोषणेनंतर महुआ मोइत्रा यांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी (PM Modi) नाताळाच्या दिवशी घोषणा करून नागरिकांना एक गिफ्ट दिले आहे. आता देशातील आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस (Booster Dose Announcement) दिला जाणार आहे. मोदींच्या या घोषणेनंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (TMC MP Mahua Moitra) यांनी ट्विट केले आहे.

मी बूस्टर डोसची मागणी केली होती. पंतप्रधान मोदींनी माझं ऐकलं. अखेर आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे, असं महुआ मोइत्रा म्हणाल्या. तसेच त्यांनी मोदींच्या या घोषणेचं स्वागत देखील केलं.

डॉक्टरांनी केली होती बूस्टर डोसची मागणी -

आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आला आहे. त्यामुळे देशात भीतीचं वातावरण आहे. कोरोनापासून वाचायचे असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही, असं सांगितलं जातं. देशात आतापर्यंत ६१ टक्के लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे देखील गरजेचे आहे. देशात सुरुवातीला फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण झालं होतं. यामध्ये डॉक्टरांचा देखील समावेश होता. आमची कोरोनाविरोधातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असावी. त्यामुळे आम्हाला बूस्टर डोस देण्यात यावा, अशी मागणी अनेक डॉक्टरांनी केली होती. तसेच इतर देशामध्ये बूस्टर डोसला यापूर्वीच परवानगी मिळाली होती. पण, भारतात मागणी करूनही सरकारने निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे काही नागरिकांनी अवैधरित्या बूस्टर डोस घेतल्याची माहिती देखील समोर आली होती.

अखेर बूस्टर डोसची घोषणा -

मोदींनी दीर्घ प्रतीक्षेनंतर नाताळाच्या दिवशी बूस्टर डोसची घोषणा केली. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर्ससाठी Precaution Dose अर्थात बूस्टर डोस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सोमवार, १० जानेवारी २०२२ पासून या सुविधेला सुरुवात होईल, असं मोदींनी सांगितलं. तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आता लसीकरण सुरू होणार असल्याचंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT