देश

'मला मतदान दिलं तरंच मोदी पंतप्रधान होतील'

सकाळन्यूजनेटवर्क

जालना :  मला निवडून दिल्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. तसेच, विरोधकांचं भाजप सोबत जमतं तेव्हा यांच्यासाठी आम्ही जातीयवादी नसतो. यांचं जेव्हा बिघडतं, तेव्हा हेच विरोधक आम्हांला जातीयवादी म्हणतात. त्यामुळे हे विरोधक आम्हांला कितीही जातीयवादी म्हणत असले तरी आमच्या पंगतीत जेवून गेलेल्या विरोधकांची खरकटी तोंडं आम्हांला अजूनही दिसत असल्याची जोरदार टीका दानवे यांनी शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधकांवर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मायावती, फारूक अब्दुल्ला, ममता बॅनर्जी यांच्यासह सर्वच नेते एकत्र आलेत. मात्र कधीकाळी यातील नेत्यांनी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेलं असून शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये भाजपचे उत्तमराव पाटील महसूल मंत्री होते असेही त्यांनी सांगितले.

आज जालना शहरात 'आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या' ओळखपत्र वाटप कार्यक्रमात दानवे यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. 'सगळेच लोक म्हणतायत मला जालना लोकसभा मतदार संघातून निवडून द्यायचं, मग निवडणूक घ्यायचीच कशाला..? असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान आधी स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजप शिवसेनेची युती झाली आहे. मात्र कार्यकर्ते अजूनही आपापल्या पक्षांच्याच विजयाच्या घोषणा देताना दिसत आहेत. या कार्यक्रमात उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी फक्त भाजप विजयाच्या घोषणा दिल्यानं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी भाजप-शिवसेना युतीचा विजय असो अशा घोषणा द्या, असा सल्ला उपस्थितांना दिल्यानं जोरदार हशा पिकलेला पाहायला मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT