देश

मान्सून वेळेआधी हजेरी लावणार; हवामान खात्याचा अंदाज

नामदेव कुंभार

पुणे - नैर्ऋत्य मोसमी पाऊस यंदा ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. फारतर यामध्ये चार दिवस पुढे-मागे होण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सून वेळेवर दाखल होणार असल्यामुळे शेतीसाठी आश्र्वासक गोष्ट आहे.देशात मॉन्सूनची सुरवात दक्षिण अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर मोसमी वारे हे वायव्य दिशेने बंगालच्या उपसागराकडे प्रवास करतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा अंदमानात २२ मे च्या आसपास मॉन्सून पोचेल. गेल्या वर्षी १७ मे दरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेला म्हणजे १ जूनला मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही ३१ मे पर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

२१ मेपासून दक्षिणेकडील बंगालच्या उपसागर आणि अंदमान व निकोबार बेटांवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील आकडेवारीवरून असे दिसून येते, की केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची तारीख आणि अंदमान समुद्रावर मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखेचा कोणताही संबंध नसल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

वर्ष - मॉन्सून दाखल होण्याची तारीख ः हवामान खात्याचा अंदाज

  • २०१६ - ८ जून - ७ जून

  • २०१७ - ३० मे - ३० मे

  • २०१८ - २९ मे - २९ मे

  • २०१९ - ८ जून - ६ जून

  • २०२० - ५ जून - १ जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT