esakal | कोरोना संकटात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पाऊस येणार मोठा!
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Forecast

कोरोना संकटात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पाऊस येणार मोठा!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. यंदा ९८ टक्के पर्जन्यमान होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे ( Ministry of Earth Sciences) सचिव एम. राजीवन यांनी याबाबतची माहिती दिली. यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागर यांमध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे यंदा पर्जन्यमान ९८ टक्के होईल. ओडिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि आसाम या राज्यांमध्ये सामान्य स्वरुपाचा पाऊस होईल, असे राजीवन म्हणाले.

हेही वाचा: ससून 'व्हेंटिलेटरवर'; एकाच बेडवर होतायत तिघांवर उपचार

मान्सूनने वेळेवर हजेरी लावली तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे. मान्सून सामान्य स्वरुपाचा होणार याचा अर्थ पिकांसाठी चांगला पाऊस होईल. कोरोनाच्या महामारीमध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे, त्यामुळे ही बातमी त्यांच्यासाठी नक्कीच दिलासादायक आहे.

स्कायमेट अंदाज

देशात जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस १०३ टक्के इतका राहण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने वर्तवला आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पुणे : २४ तासात कोरोनाने घेतले शंभराहून अधिक बळी

स्कायमेट या संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार जूनमध्ये चांगला पाऊस पडेल आणि मुंबईत मॉन्सून वेळेत दाखल होईल. सरासरी ८८०.६ मिलिमीटर पाऊस पडला तर तो सामान्य पाऊस असे गृहीत धरले जाते. मात्र, स्कायमेटचा अंदाजानुसार देशात यंदा ९०७ मिलिमीटर इतका पाऊस पडेल. हा अंदाज खरा ठरला तर सलग तिसऱ्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. यंदा जुलैमध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात चांगला पाऊस पडणार आहे. तर पूर्वेकडील भागात आणि कर्नाटकामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेश आणि देशाच्या पश्चिम भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: भारतावर आली ऑक्सिजन आयात करण्याची वेळ; केंद्राचा मोठा निर्णय

पावसाचा अंदाज

महिना - पाऊस (मिलिमीटर) - टक्केवारी

जून १६६.९ १०६

जुलै २८९.० ९७

ऑगस्ट २५८.२ ९९

सप्टेंबर १७०.२ ११६