महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट! चक्रीवादळ गुजरातला धडकणार

लक्षद्वीपजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राकडे सरकला असल्याने येत्या बारा तासांत चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
South Keral
South KeralSakal

नवी दिल्ली / मुंबई - गोवा, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचे (Rain) भाकीत हवामान खात्याने (Weather Department) वर्तविले आहे. अरबी समुद्राच्या (Arabian Sea) नैऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. या क्षेत्रात आणि लक्षद्वीपच्या भागात ‘तौत्के’ चक्रीवादळ (Cyclone) धडकण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. केरळ सरकारने (Keral Government) किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी केला आहे, तर महाराष्ट्रातही (Maharashtra) किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Cyclone hits Gujarat coast till Tuesday)

लक्षद्वीपजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राकडे सरकला असल्याने येत्या बारा तासांत चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. हे चक्रीवादळ मंगळवारपर्यंत (ता. १८) गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचीही चिन्हे असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

हवामान खात्याने आगामी पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला असून यात गोवा आणि कोकणातील काही भागात याशिवाय रविवारी गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे.

South Keral
दक्षिण कोरियाकडूनही भारताला मदत; दोन विमाने दिल्लीत दाखल

कोकणात पावसाचा इशारा

अरबी समुद्रात उठलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर उद्या (ता. १५) सकाळी चक्रीवादळात होणार असून, यामुळे मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. चक्रीवादळाचा प्रवास हा समुद्रमार्गे असून, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोवा आणि कोकण विभागामध्ये शनिवार (ता. १५) ते रविवार (ता. १६) दरम्यान ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, या कालावधीत दक्षिण कोकणात (सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी) बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रविवारी (ता. १६) आणि सोमवार (ता. १७) दरम्यान उत्तर कोकणात (रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर) तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, मंगळवारी (ता. १८) या भागाव्यतिरिक्त कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी (ता. १६) वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतःच्या कुटुंबाची तसेच जनावरांची सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी थांबावे. घराच्या सभोवतालचे क्षेत्र तपासून घराला धोका संभवत असलेली झाडे किंवा फांद्या काढून टाकाव्यात, तसेच पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त साठा करून ठेवावा, असे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत अडचण येऊ नये यासाठी बॅटरी, मोबाईल चार्ज करून ठेवावेत. कच्चे घर, विद्युत खांब आणि झाडाच्या खाली थांबू नये, असे सांगण्यात आले आहे. मच्छीमारांनी मंगळवारपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही केले आहे.

South Keral
मान्सून वेळेआधी हजेरी लावणार; हवामान खात्याचा अंदाज

किनाऱ्यांवरील सुरक्षा वाढविली

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळामुळे येत्या रविवारी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व किनाऱ्यांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शनिवारपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात रूपांतर होणार आहे. रविवारी मुंबईत २४ तासांत १११५ मि.मीपर्यंत पावसाचा अंदाज आहे. मुंबईतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

केरळमध्ये मुसळधार पाऊस

कोट्टायम : कोट्टायम व दक्षिण केरळमधील काही भागांत शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस पडला, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली. त्याचप्रमाणे केरळमध्ये उद्याही (ता.१५) पाऊस पडणार असल्याचा अंदाजही वर्तविण्‍यात आला होता.

म्यानमारकडून नामकरण

या चक्रीवादळाचे म्यानमारने ‘तौक्ते’ असे नामकरण केले आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका सरड्याचे नाव आहे. भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना भारतासह, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार आदी बारा देशांकडून क्रमाने नाव दिले जाते. भारतीय हवामान विभागाने भविष्यात बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या १६९ चक्रीवादळांच्या नावांची यादी जाहीर केली.

South Keral
भारतात उपलब्ध होणारी Sputnik V लस काय आहे? जाणून घ्या सर्वकाही

बचाव पथके तैनात

तौत्के चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू या राज्यांसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ)५३ पथके तयार केली आहे, अशी माहिती या संस्थेचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली.

रुग्णांचे स्थलांतर करणार

मुंबई : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोविड केंद्राच्या अतिदक्षता विभागातील ३९५ रुग्णांचे स्थलांतर करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. निसर्ग वादळामुळे गेल्या वर्षी वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केंद्रात पाणी भरले होते.

मॉन्सून ३१ मे रोजी केरळात

पुणे - नैॡत्य मोसमी पाऊस यंदा ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी कळवले आहे. फारतर यामध्ये चार दिवस पुढे-मागे होण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सून वेळेवर दाखल होणार असल्यामुळे शेतीसाठी आश्र्वासक गोष्ट आहे.

देशात मॉन्सूनची सुरवात दक्षिण अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर मोसमी वारे हे वायव्य दिशेने बंगालच्या उपसागराकडे प्रवास करतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा अंदमानात २२ मे च्या आसपास मॉन्सून पोचेल. गेल्या वर्षी १७ मे दरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेला म्हणजे १ जूनला मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही ३१ मे पर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

२१ मेपासून दक्षिणेकडील बंगालच्या उपसागर आणि अंदमान व निकोबार बेटांवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील आकडेवारीवरून असे दिसून येते, की केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची तारीख आणि अंदमान समुद्रावर मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखेचा कोणताही संबंध नसल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

मॉन्सूनचे केरळमधील आगमन

वर्ष - मॉन्सून दाखल होण्याची तारीख ः हवामान खात्याचा अंदाज

  • २०१६ - ८ जून - ७ जून

  • २०१७ - ३० मे - ३० मे

  • २०१८ - २९ मे - २९ मे

  • २०१९ - ८ जून - ६ जून

  • २०२० - ५ जून - १ जून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com