Manish Tiwari Prithviraj Chavan esakal
देश

Congress : मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची दाट शक्यता!

राहुल गांधी निवडणूक लढवणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी निवडणूक लढवणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे.

Congress President Election 2022 : काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री (Madhusudan Mistry) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी गुरूवारी अधिसूचना जारी केली. त्यानुसार, उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. त्यात एकाहून अधिक नेत्यांनी उमेदवारी दाखल केली, तर 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल. तर 19 ऑक्टोबर रोजी निकाल घोषित होईल.

विद्यमान स्थिती पाहता अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार शशी थरूर व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मिस्त्रींनी पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना निवडवणूक लढवण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान, आता मनीष तिवारी (MP Manish Tiwari) यांचंही नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आलं आहे. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी करत असल्याचं कळतंय.

खासदार तिवारीही पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तिवारी 24 सप्टेंबरला रात्री दिल्लीत पोहोचणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर ते यासंदर्भात आपल्या समर्थकांशी चर्चा करून निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेतील. मनीष तिवारी हे एनएसयूआयचे 5 वर्षे आणि युवक काँग्रेसचे 2 वर्षे अध्यक्षही राहिले आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तिवारी G-23 गटातही सहभागी झाले आहेत. याशिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचीही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका असू शकते. त्यांच्या नावाची चर्चाही जोर धरू लागली आहे. येत्या तीन-चार दिवसांत अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याचा दावा करणारी आणखी अनेक नावं बाहेर येऊ शकतात, असं मानलं जात आहे. दरम्यान, नवीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाचा विचार केला जात आहे. राहुल गांधी निवडणूक लढवणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. मात्र, उमेदवारी प्रक्रियेदरम्यान 24 ते 30 या कालावधीत राहुल गांधी भारत जोडो यात्रेत राहणार असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! आयात शुल्क वाढीनंतर आज सर्वात कमी दर; उच्चांकापासून तब्बल 23 हजारांनी स्वस्त; पाहा ताजे भाव

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Sugarcane farmers: नेत्यांच्या साखरसाम्राज्यात अडकले शेतकऱ्यांच्या घामाचे २१८ कोटी; सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

Firefly Festival: काजवा महोत्सवाची परदेशी पर्यटकांना भुरळ; जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील निसर्गप्रेमी अकोल्यात

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

SCROLL FOR NEXT