CM गेहलोत नंतर दिग्विजय सिंह अध्यक्षपदाच्या शर्यतीत; आज सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digvijay Singh Sonia Gandhi

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 1 महिन्याहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.

CM गेहलोत नंतर दिग्विजय सिंह अध्यक्षपदाच्या शर्यतीत; आज सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता!

Congress President Election 2022 : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 1 महिन्याहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी बुधवारी सोनिया गांधींची भेट घेतली. या बैठकीत सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक निष्पक्ष असेल. आपण कुणालाही वैयक्तिक मान्यता देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

त्यातच आता अशोक गेहलोत यांच्या नंतर दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांचाही काँग्रेस अध्यक्ष पदासाठी इशारा दिल्यानं आता आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. हे नाव जर पुढं आलंच तर मात्र काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अधिकच रंजक होणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

हेही वाचा: देशभरात PFI च्या अनेक ठिकाणांवर NIA, ED ची मोठी कारवाई; 100 हून अधिक लोकांना अटक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी सोनिया गांधींसोबत निवडणूक लढवण्यासाठी एनओसीही मिळवली आहे, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सध्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीत व्यस्त आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोन नावांची चर्चा असली तरी या शर्यतीत दिग्विजय सिंहही मागं राहिले नाहीत. त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, तुम्ही मला या शर्यतीतून बाहेर का समजत आहात. त्यामुळं त्यांचा हा बोलण्याचा इशारा आणखी एक नाव काँग्रेस अध्यक्ष पदाच्या यादीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आज दिल्लीत पोहोचणार असून ते पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता आहे. पक्षाध्यक्षपदाचे तेही दावेदार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा: BJP : आता कुणाला घाबरायची गरज नाही, जशास तसं उत्तर द्या; भाजप आमदाराचं थेट आव्हान

Web Title: Congress Leader Digvijay Singh Is Likely To Meet Sonia Gandhi In Delhi Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..