Mandeep Singh Bajwa
Mandeep Singh Bajwa 
देश

'संघाच्या लोकांना बघितलं तरी माझं रक्त खवळतं'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जेव्हा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना पाहतो, तेव्हा माझे रक्त खवळते. कारण या देशासाठी कधीही काहीही न केलेल्या संघाच्या लोकांना असे वाटते की, जनरल दीपक कपूर भारताला अस्थिर करण्यासाठी पाकिस्तानसोबत हातमिळवणी करुन कट रचत आहेत मात्र संघाच्या या आरोपात काही तथ्य नाही. कपूर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची जाणिव या मंडळीना नाही असा जोरदार हल्लाबोल राजकीय विश्‍लेषक आणि कॉंग्रेसचे नेते मनदीपसिंग बाजवा यांनी ट्विटद्वारे केला आहे. 

बाजवा यांनी संघावर कडाडून हल्ला करताना म्हटले आहे, की या मंडळींच्या लक्षात येत नाही की कपूर यांच्या नसानसात राष्ट्रभक्ती आहे. पाकिस्तानबरोबर 1971 मध्ये झालेल्या युद्धात त्यांनी भारतमातेचे संरक्षण केले होते. याचा नेमका विसर त्यांना पडतो आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून कॉंग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांशी भेट घेतल्याचा दावा करीत या भेटीचे स्पष्टीकरण मागितले होते. मोदींच्या या दाव्यात तथ्य नसल्याचे कॉंग्रेसने म्हटले होते. मात्र, आता या बैठकीला आपणही उपस्थित असल्याचे माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी सांगितल्यान कॉंग्रेस तोंडघशी पडली आहे. 

मोदींच्या या टीकेनंतर कपूर यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीकास्त्र होत आहे. कपूर यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण द्यायला हवे असे नेटीझनची मागणी आहे. मात्र  ट्‌विटरवर दीपक कपूर यांना जाब विचारणारे आणि स्पष्टीकरण मागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे समर्थक असल्याचा दावा बाजवा यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT