Union Budget 2023  esakal
देश

Union Budget 2023: आपल्या आईला बजेट सांगतांना बघून भारावून गेली निर्मला सीतारामन यांची मुलगी..

या लोकांमध्ये निर्मला सीतारामन यांची मुलगी वांग्मयी परकाला आणि त्यांचे नातेवाईक होते.

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचे मोदी सरकारचे शेवटचे पूर्ण बजेट संसदेत सादर केले. आज जेव्हा त्या २०२३-२४ चे आर्थिक वर्षाचे बजेट सादर करत होत्या तेव्हा लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत त्यांची मुलगी आणि नातेवाईक सुद्धा उपस्थित होते.

नरेंद्र मोदी सरकारच्या सध्याच्या कारकिर्दीचा हे शेवटचे पूर्ण बजेट असल्याने लोकसभेची गॅलरी, हे बजेट ऐकण्यासाठी आलेल्या लोकांनी खचाखच भरलेली होती. या लोकांमध्ये निर्मला सीतारामन यांची मुलगी वांग्मयी परकाला आणि त्यांचे नातेवाईक होते.

सीतारामन यांनी बजेटच्यावेळी अनेक प्रस्तावांची घोषणा केल्याने त्यांच्या नोंदी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि लोकसभेच्या गॅलरीत बसलेले राज्यसभेचे अनेक सदस्य नोट्स लिहितांना दिसले.

अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, जागतिक अनिश्चिततेमध्ये सुद्धा देशाची आर्थिक वाढ ही सकारात्मक असल्याने जगाने भारताला नक्कीच एक चमकता तारा म्हणून ओळखले आहे.

त्या म्हणाल्या की, चालू आर्थिक वर्षात भारताचा सात टक्के विकास दर हा प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे आणि भारताची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर जात आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात जगाने भारताला एक चमकता तारा म्हणून ओळखले आहे आणि जगाने देशाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT