देश

No Confidence Motion: सुप्रिया सुळे, अमित शहा यांच्यात शाब्दिक चकमक; पवारांचा दाखला देत शहांनी खोडले आरोप

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधकांच्या आरोपांना आज अमित शहांनी उत्तर दिलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

No Confidence Motion: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर आज दिवसभर चर्चा पार पडली. यावेळी अमित शहांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरं दिली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांवरुन गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांची शाब्दिक चकमकही झाली. यावेळी सुळेंना उत्तर देताना शहांनी शरद पवारांची आठवण करुन देत त्यांना उत्तर दिलं. (No Confidence Motion Clash between Supriya Sule and Amit Shah Mention of Sharad Pawar govt)

शहा म्हणाले, "संस्था उद्ध्वस्त करण्याचं काम सरकारकडून केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या गौरव गोगोई यांनी केला होता. मला सांगायचं आहे की, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सुप्रीम कोर्टाच्या ४ वरिष्ठ न्यायाधीशांना डावलून हंसराज खन्ना यांना त्यांनी सरन्यायाधीश बनवलं. त्यानंतर आपल्याच खटल्यात त्यांचा वापर केला.

कॅगला सरकारी कामकाजापासून दूर ठेवण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. जेएनयूला टाळं लावण्याचं कामही त्यांच्याच काळात झालं. युपीएससीचे अधिकारही त्यांनी हिसकावले"

शरद पवारांनी पहिल्यांदा सरकार पाडलं

दरम्यान, सकाळी चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना भाजपनं गेल्या ९ वर्षात ९ सरकारं पाडली असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना शहा म्हणाले, सुप्रिया सुळेंनी म्हटलं की आम्ही सरकार पाडलं. पण महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी सरकार पाडलं असेल तर ते शरद पवारांनी पाडलं. वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून भारतीय जनसंघाच्या समर्थनानं ते पुन्हा मुख्यमंत्री बनले.

सुळे पुन्हा बोलल्या अन् शहा चिडले

यावर सुप्रिया सुळे यांनी शहांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, "त्या सरकारचे समन्वय एसएम जोशी होते" त्यावर शहा चिडले आणि म्हणाले, "जोशी समन्वयक होते हे बरोबर आहे. पण मुख्यमंत्री कोण झालं आणि सत्ता कोणी भोगली? सत्तेचं सुख कोणी प्राप्त केलं? शरद पवारांनी"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi: कारवाई न करण्यासाठी लाच मागितली; माहिती मिळताच ACB चा सापळा, ठाण्यातील मोठा अधिकारी अटकेत

MRP Protest Delhi: एमआरपीतील त्रुटींविरोधात जंतर-मंतरवर राष्ट्रीय आंदोलन; महाराष्ट्रातून ५०० कार्यकर्ते नवी दिल्लीत रवाना

Latest Marathi News Live Update : ‘काळा पैसा आणि कर आकारणी कायद्या’अंतर्गत अनिल अंबानींविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

SCROLL FOR NEXT