अहमदाबाद - आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news in Marathi)
अहमदाबादमध्ये स्वच्छता कर्मचारी असलेले हर्ष सोलंकी उद्या आपल्या कुटुंबासह दिल्लीला जाणार आहेत. केजरीवाल त्यांचा संपूर्ण खर्च उचलणार आहेत. हे कुटुंब दिल्लीतील पंजाब भवनमध्ये मुक्कामी राहणार आहे.
सर माझी एक विनंती आहे. तुम्ही मागच्या वेळी ऑटो रिक्षा चालकाच्या घरी जेवलात. तुम्ही वाल्मिकी समाजातील कुणाच्या घरी येऊन जेवण कराल का?, असा प्रश्न हर्ष सोलंकी नावाच्या स्वच्छता कर्मचाऱ्याने विचारला होता. त्यावर केजरीवाल म्हणाले की, हर्ष मी तुमच्या घरी नक्की येईन. पण त्याआधी माझी एक विनंती तुम्ही मान्य कराल का? त्याला सोलंकी यांनी लगेच मान्यता दिली.
केजरीवाल म्हणाले, "मी निवडणुकीपूर्वी पाहिले, की सर्व नेते दलितांच्या घरी जाऊन जेवण करतात. पण आजपर्यंत एकाही नेत्याने दलितांना त्यांच्या घरी बोलावले नाही. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या घरी जेवणासाठी आमंत्रीत करत आहे. तुम्ही माझ्या घरी जेवणासाठी याल का? यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. तर सोलंकी यांनी लगेच आमंत्रण स्वीकारलं.
केजरीवाल म्हणाले की ते उद्या पाच जणांच्या कुटुंबाला विमानाची तिकिटे पाठवतो. तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांच्या घरी याल, तुमचे संपूर्ण कुटुंब आणि माझे कुटुंब आपण एकत्र जेवण करू आणि पुढच्या वेळी मी जेव्हा अहमदाबादला येईन तेव्हा तुमच्या घरी जेवण करेन.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.