Dilshad-Garden-Delhi 
देश

Lockdown : दिल्लीत यशस्वी ठरलं 'ऑपरेशन शिल्ड'; कोरोनाला रोखण्यात यश!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीभोवती कोरोना व्हायरसचा विळखा घट्ट होत असतानाच आता तेथून एक चांगली बातमी मिळत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन शिल्ड राबवित आहे. याला यश मिळत असल्याचे दिसून आले.

दिल्लीच्या दिलशाद गार्डन या भागात ऑपरेशन शिल्ड यशस्वीपणे राबविण्यात आले. एकापाठोपाठ एक अशा ८ कोरोना पॉझिटिव्ह केसेस आल्यानंतर १५ दिवसांत हा भाग कोरोनामुक्त झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून या भागातील एकही नवी केस समोर आली नाही. 

सीसीटीव्हीचा वापर

दिलशात गार्डन भागात राहणारी एक महिला आणि तिचा मुलगा हे सौदी अरेबियाहून आल्यानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली. या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरसमवेत इतर ७ लोक कोरोनाने पीडित झाले होते. त्यानंतर दिलशाद गार्डन आणि सीमापुरी भाग हा कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला होता. महिलेच्या संपर्कात आलेल्या ८१ जणांचा शोध घेऊन सर्वांना क्वॉरंटाइन करण्यात आले. तर तिच्या मुलाच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर करण्यात आला. 

१२३ मेडिकल टीम्सची मदत

कन्टेन्मेंट झोनची पूर्णपणे तपासणी करण्यासाठी १२३ वैद्यकीय पथके (मेडिकल टीम) नेमण्यात आली होती. या सर्व पथकांनी ४०३२ घरांमध्ये राहणाऱ्या सुमारे १५ हजारहून अधिक लोकांची वैद्यकीय तपासणी केली. आणि ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती, त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. दुसरीकडे सरकारी यंत्रणेने १५ हजार दिल्लीकरांना फोनवरून संवाद साधत कोरोनासंदर्भात विचारपूस करत होती. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सूचनेनुसार दिलशाद गार्डनमध्ये ऑपरेशन शिल्ड राबविण्यास सुरवात केल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. 

१० मार्चला सौदी अरेबियाहून आलेल्या महिलेमध्ये १२ मार्चला सर्दी आणि तापाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर १५ मार्चला तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. आणि १७ मार्चला ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. दिलशाद गार्डन भागात कोरोना आढळल्याने दिल्ली सरकारने लगेच संबंधित यंत्रणा कामाला लावल्या. १२३ वैद्यकीय पथके तैनात केली. दिलशाद गार्डन आणि सीमापुरी भाग सील करण्यात आला. या दोन्ही भागातून येण्या-जाण्यावर निर्बंध घालण्यात आले.

एका टीमवर ५० घरांचे स्क्रीनिंग करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. १५ हजारहून अधिक नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आल्यावर ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली त्यांना आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोरोनाला आळा घालण्यात यश आले असले तरी आजही या १२३ टीमचे काम सुरूच आहे. दररोज फोनद्वारे लोकांची विचारपूस करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT