मुंबई न्यू-यॉर्कच्या २९ दिवस मागे, मुंबई न्यू-यॉर्क वाटेवर चालतेय का ?

मुंबई न्यू-यॉर्कच्या २९ दिवस मागे, मुंबई न्यू-यॉर्क वाटेवर चालतेय का ?

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे मुंबई आता न्यूयॉर्कच्या वाटेवर जातेय की काय अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.

देशात कोरोनाग्रस्तांच्या वाढणाऱ्या आकड्यात प्रत्येक १० पैकी एक जण मुंबईतला रुग्ण आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा १ हजार ७४ वर गेलाय. तर देशात मृत्यू झालेल्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी ६४ रुग्ण मुंबईतील आहेत. यामुळे हळूहळू मुंबईची परिस्थितीही अमेरिकेच्या न्यूयॉर्कसारखी होत चालली आहे की काय अशी चिंता आता व्यक्त केली जातेय.

न्यू-यॉर्कसारखी परिस्थिती मुंबईत ?

न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत १,५९,९३७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ७,०६७    लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये मार्चला कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. त्याच दिवशी मुबंईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाच्या बाबतीत मुंबई न्यूयॉर्कच्या तुलनेत फक्त २९ दिवासांनी मागे आहे. मात्र मुंबईचा वाढत आकडा पाहून मुंबईची परिस्थिती न्यूयॉर्क सारखी होऊ नये याची काळजी प्रशासनाकडून घातली जातेय.

खरं म्हणजे अमेरिकेच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १८,७६३ मृत्यू झाले आहेत. भारतात आत्तापर्यन्त  २५२ जणांचा मृत्यू झाला आहे. जगाच्या तुलनेत हे आकडे जरी कमी असले तरी आपल्या सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे, प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

is mumbai marching on the path of new york in corona virus crisis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com