Arvind Kejriwal file photo
देश

दिल्लीत ऑक्सिजनची आणीबाणी; रुग्णालयांमध्ये काही तासांपुरताच साठा शिल्लक

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केंद्राकडे तातडीने ऑक्सिजन पुरवण्याची मागणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ऑक्सिजनची आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. काही रुग्णालयांमध्ये केवळ काही तासांचाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने दिल्लीला ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटलं होतं की, "दिल्लीतील बहुतेक रुग्णालयांमधील ऑक्सिजन ८ ते १२ तासांमध्ये संपून जाईन. ज्या रुग्णालयांमध्ये ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे त्या रुग्णालयांची नावेही त्यांनी ट्विट करुन जाहीर केली होती.

दरम्यान, केंद्रानं आज दिल्ली हायकोर्टात सांगितलं की, देशाच्या राजधानीला ऑक्सिजन पुरवठ्यात कुठलाही खंड पडलेला नाही. त्याचबरोबर दिल्लीतील सरकारी रुग्णालयांना १३९० व्हेंटीलेटर्स पुरवण्यात आले आहेत. तसेच पीएम केअर फंडाच्या माध्यमातून दिल्लीत ८ ऑक्सिजन उत्पादनं करणारे प्रकल्प सुरु करण्याची सरकारची योजना आहे. रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सध्या उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठाही थांबवण्यात आला असल्याचंही केंद्रानं कोर्टात सांगितलं.

दिल्लीत कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाल्याने संसर्गाची चेन तोडण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी २६ एप्रिलपर्यंत सहा दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Viral Video : स्वच्छतागृहात शिवरायांचा अन् राणी पद्मावतींचा फोटो; नेटकऱ्यांनी आक्षेप घेताच बदलला फोटो...

Hulikunteshwara Temple : 'देवा, माझी सासू पुढील वर्षीच्या जत्रेपूर्वी मरू दे..'; दानपेटीत आढळलेल्या 100 रुपयांच्या नोटेवरील मजकूराने खळबळ, कोणी लिहिलं असं?

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Summer Fruit Shopping Tips: गोड की केमिकल? कलिंगड खरेदी करताना ‘या’ 5 टिप्स नक्की तपासा

अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री, त्यांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवलं; CM फडणवीसांनी सांगितल्या आठवणी, शेवटची भेट...

SCROLL FOR NEXT