esakal | "सध्या देशसेवेची संधी द्या, नंतर पुन्हा निलंबित करा"; डॉ. काफिल खान यांचं मुख्यमंत्री योगींना पत्र

बोलून बातमी शोधा

Kafeel Khan
"सध्या देशसेवेची संधी द्या, नंतर पुन्हा निलंबित करा"; डॉ. काफिल खान यांचं मुख्यमंत्री योगींना पत्र
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लखनऊ : सन २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर येथील सरकारी रुग्णालयातील बालमृत्यूप्रकरणी निलंबित करण्यात आलेले डॉ. काफिल खान यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नुकतचं एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये सध्या आपल्याला देशसेवेची संधी द्या नंतर पुन्हा निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी देखील त्याचं पत्र ट्विटरवर शेअर करत यावर जनहितार्थ निर्णय घेण्याची सल्ला योगींना दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. काफिल खान म्हणतात, "मी कोरोना पीडित लोकांची मदत करु इच्छितो. गंभीर रुग्णांवर उपचारांचा आपल्याला १५ वर्षांचा अनुभव आहे. हा अनुभव कदाचित लोकांचे जीव वाचवण्याच्या कामी येईल. त्यामुळे माझं निलंबन मागे घेऊन मला पुन्हा सेवेची संधी द्यावी, हवंतरं कोरोना महामारी संपल्यानंतर मला पुन्हा निलंबित करा. नुकतंच बीआरडी मेडिकल कॉलेजचे माजी डीन डॉ. राजीव मिश्रा आणि डॉ. सतीशकुमार यांचं निलंबन मागे घेण्यात आलं. मात्र, माझं निलंबन मागे घेतलं गेलं नाही. यासाठी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ३६ हून अधिक पत्र लिहिली आहेत."

हेही वाचा: लष्कराच्या वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी खुल्या करा; राजनाथ सिंह यांचे निर्देश

निलंबनाच्या कारवाईनंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिगड मुस्लीम विद्यापीठात सीएए विरोधातील आंदोलनात डॉ. काफिल खान यांनी कथीत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, त्यांना अद्यापही सरकारी सेवेतून निलंबितच ठेवण्यात आलं आहे.

हेही वाचा: कोरोनाचा कहर : नेट परीक्षाही ढकलली पुढे; एनटीएची घोषणा

राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) गुन्हा दाखल करण्याविरोधात डॉ. काफिल खान यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गेल्यावर्षी ११ ऑगस्ट रोजी या याचिकेवर सुनावणी करताना डॉ. खान यांची हायकोर्टात प्रलंबित याचिकेवर १५ दिवसांत सुनावणी केली जावी असे निर्देश दिले होते.