esakal | लष्कराच्या वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी खुल्या करा; राजनाथ सिंह यांचे निर्देश

बोलून बातमी शोधा

rajnath-singh
लष्कराच्या वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी खुल्या करा; राजनाथ सिंह यांचे निर्देश
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशातील सध्याच्या कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराला मदतीसाठी तयार राहण्याचे तसेच उद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांना या काळात आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवण्याच्या सूचनाही त्यांनी लष्कराला केल्या आहेत.

हेही वाचा: कोरोनाचा कहर : नेट परीक्षाही ढकलली पुढे; एनटीएची घोषणा

लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्याशी संपर्क साधून राजनाथ सिंह यांनी राज्यांच्या राजधान्यांमध्ये असलेल्या लष्कराच्या कमांडर्सना संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यास सांगितले. तसेच लष्करानं त्यांच्या वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी खुल्या करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: कडक निर्बंध : सकाळी ७ ते ११ या वेळेतच राहणार दुकानं सुरु; आजपासून नवी नियमावली लागू

संरक्षण सचिव अजयकुमार हे देखील संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांमधील चर्चेवेळी उपस्थित होते. या चर्चेमध्ये देशभरात कॅन्टोन्मेट बोर्डाकडून चालवल्या जाणारी रुग्णालये छावणी भागात राहणाऱ्या आणि बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठीही खुली करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: देशात कोरोना लसीचे 44 लाखांहून अधिक डोस वाया; 'या' राज्यांनी वापरले पूर्ण डोस

दरम्यान, डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं (डीआरडीओ) दिल्लीत आधीच २५० बेडची ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर्ससह सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा लवकरच ५०० बेडपर्यंत वाढवण्यात येणार आहे. लखनऊमध्ये डीआरडीओ दोन रुग्णालयं उभारणार आहे. ही रुग्णालयं फक्त कोविडच्या रुग्णांसाठीच असतील.