petition filed in Supreme Court  demanding SIT Investigation of electoral Bond case
petition filed in Supreme Court demanding SIT Investigation of electoral Bond case  
देश

Electoral Bond : इलेक्टोरल बाँड प्रकरण हा मोठा घोटाळा, याची SIT चौकशी करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. २४ः निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून त्याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जावी, असे सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थांनी ही याचिका दाखल केली आहे.

ईडी, सीबीआयकडून चौकशी सुरु असलेल्या ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला, अशा कंपन्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असे याचिकेत म्हटले आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी देण्याची पध्दत घटनाबाह्य असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने या योजनेवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात बंदी घातली होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार हा देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यामुळे त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून चौकशी व्हावी, असे याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयास सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT